शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी तब्बल चौदा फॅन भेट
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त करत शाळेबाबत आपुलकी म्हणून शाळेला तब्बल 14 फॅन भेट देत शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेच्या १९९९ ते २००० साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झालेला असताना शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काही मदत करण्याची भावना व्यक्त केली होती. त्यांनतर शाळेतील मुलांसाठी शाळेच्या सात खोल्यांमध्ये प्रत्येकी 2 फॅन देऊ केले.
नुकतेच शाळेचे माजी विद्यार्थी अॅड. अतुल ताजणे, ग्रामविकास अधिकारी सदानंद फडतरे, अशोक भुजबळ, माजी सरपंच सुषमा हरगुडे, उद्योजक किरण राऊत, जितेंद्र फंड, ऋषिकेश करंजे, सचिन गायकवाड, प्रकाश सासवडे, दिपक सासवडे, रवींद्र उमाप, सारिका पोखरकर, शबाना शेख, संदीप पवार यांसह आदी माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येत शाळेला सदर भेट देऊ केली आहे. यावेळी प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुनील थोरात, पर्यवेक्षक संजय शेळके, माजी उपसरपंच सुभाष खैरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मांढरे यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना शाळेतून शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर झाल्यानंतर देखील माजी विद्यार्थी शाळेचे हित जपत असल्याची बाब आम्हा शिक्षकांसाठी आनंददायी असल्याचे मत पर्यवेक्षक संजय शेळके यांनी व्यक्त केले, तर पुढील काळात देखील माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेला आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे माजी विद्यार्थी अॅड. अतुल ताजणे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी सर्वांचे आभार मानले.