शिरुर येथील माई छात्रालयात अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील सिंधुताई सपकाळ यांच्या माई छात्रालय येथील विद्यार्थ्यांसाठी अक्षर मानव संघटना आणि पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्थेच्या वतीने पर्यावरण मित्र आणि माणूस म्हणजे काय…? या दोन विषयांवर नुकत्याच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ संतोष पोटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर पत्रकार नितीन बारवकर तसेच पत्रकार प्रविण गायकवाड यांनी वर्तमान पत्राबद्दल मुलांना माहिती दिली. तसेच मुलांना वर्तमान पत्र कसे छापले जाते यासाठी प्रिंटिंग प्रेस दाखविण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारतच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रसिद्धीप्रमुख जिजाबाई दुर्गे, महाराष्ट्र राज्य महिला सहसचिव सुजाता रासकर, पत्रकार सतिश धुमाळ, तर्डोबाचीवाडी गावाच्या सरपंच धनश्री मोरे, शिरुर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका कविता वाटमारे, देवदैठणच्या माजी आदर्श सरपंच मंगल कौठाळे, आरोग्य खात्याच्या आशा गुंड, माई छात्रालयातील विनय सपकाळ, शुभांगी सपकाळ यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. तसेच शिरुर येथील मीरा नर्सिंग होमची संपुर्ण टीम यावेळी उपस्थित होती.