तगाद्याला कंटाळून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण: वाठार निंबाळकर येथील शिव लॉजिस्टिक कंपनीचे मालक व ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासाहेब खोपडे (वय ४२) यांनी सावकाराचा तगादा, वाहन खरेदी व्यवहारातील फसवणूक आणि फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच बेकायदेशीर […]

अधिक वाचा..

‘१ मेपासून मराठी सक्ती’चा फुगा फुटला? विरोधानंतर सरकारची माघार

मुंबई: राज्यात ‘१ मेपासून मराठी सक्ती’ या घोषणेनंतर निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला आहे. परिवहन विभागाकडून करण्यात आलेल्या या घोषणेला सुरुवातीला मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून तीव्र विरोध समोर आल्यानंतर सरकारची भूमिका नरम झाल्याचे दिसत आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करताना, यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम […]

अधिक वाचा..

बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र पेटला; माफी नंतरही वाद कायम

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप; राज्यभर आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया तीव्र नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र वाद निर्माण झाला आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी सत्ता समर्थ रामदास यांच्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती” असे विधान केले. […]

अधिक वाचा..

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिली. शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस आपली सेवा” या व्यापक अभियानाच्या माध्यमातून प्रवासी सेवेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, अशा व्यक्तीने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत कशी केली? छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे […]

अधिक वाचा..

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मे ते १९ मे दरम्यान नऊ दिवसांचे मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात कलावंत, शिक्षक व प्राध्यापकांसाठी विशेष बॅचची सोय करण्यात आली आहे. नाट्यसंस्कृतीला चालना देणे, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन […]

अधिक वाचा..

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला […]

अधिक वाचा..

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला असून, या दौऱ्यात Sugar Research Australia (SRA) या जागतिक दर्जाच्या ऊस संशोधन संस्थेला भेट दिली जाणार आहे. या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह नामांकित शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय अभ्यासदौऱ्यामुळे महाराष्ट्रातील […]

अधिक वाचा..

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी म्हणजे नारीशक्ती, असा प्रभावी संदेश देत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’चा शुभारंभ केला. जलसंवर्धन, संस्कृती आणि विकास यांचा संगम घडवणारे हे नवे विकास मॉडेल त्यांनी यावेळी मांडले. श्रीक्षेत्र चौंडी येथे पार पडलेल्या या सोहळ्यात […]

अधिक वाचा..