पिंपळसुटी परिसरात भरधाव पिकअप पलटी झाल्याने पिता-पुत्रासह तिघे जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे): काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील गुरांच्या बाजाराकडे म्हैस विक्रीसाठी जात असताना पिंपळसुटी (ता.शिरुर) चालकाचा ताबा सुटल्याने महिंद्रा पिकअप रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात न्हावरा येथील पिता-पुत्रासह तिघेजण जखमी झाले असून, पिकअप चालकाविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना शनिवार दि २७ जून २०२६ रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, दिराविरोधात तक्रार…

शिरूर (तेजस फडके) : विवाहानंतर अवघ्या एक महिन्यापासून पती, सासु आणि दिराने वारंवार शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका विवाहित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पतीसह सासू आणि दिराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. विद्या महेश चव्हाण (वय ३६) असे तक्रारदार […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर! आमची पाइपलाइन तोडू नका असे सांगताच लाथाबुक्क्यांनी मारहाण…

न्हावरे: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे शेतातील पाण्याची पाइपलाइन जेसीबीच्या साह्याने तोडल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून, महिलांसह अन्य व्यक्तींनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी सुधाकर दत्तात्रय मोरे, संग्राम सुधाकर मोरे, सुनिता ऊर्फ सुमिता सुधाकर मोरे, (सर्व […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

न्हावरे: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे शेतजमिनीची मशागत सुरु असताना शेजारील जमीनधारकांनी कामाला विरोध करत ६५ वर्षीय शेतकरी, त्यांची पत्नी आणि मुलाला शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याला दगडाने, तर त्यांच्या मुलाला बांबूच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरोधात शिरूरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर दत्तात्रय […]

अधिक वाचा..
waghale-dindi-2026

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे येथून न्यू वाघेश्वर पायी दिंडी सोहळा, वाघाळे यांचे बुधवारी (ता. ८) अत्यंत भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाच्या निनादात, भगव्या पताका फडकवत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”च्या अखंड जयघोषात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.   View this post on Instagram […]

अधिक वाचा..

‘अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या’; मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात महाराष्ट्र शासनाने […]

अधिक वाचा..

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील ‘एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५ पैकी तब्बल १९१ तालुके अजूनही औद्योगिक समूहाविना असल्याचा गंभीर मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत उपस्थित केला. नियम ९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या सूचनेद्वारे तांबे यांनी एमआयडीसी नसलेल्या व औद्योगिक विकासापासून वंचित तालुक्यांमध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या युवक-युवतींसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. विधानपरिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रक (Annual Calendar) जाहीर करण्याची मागणी केली असून, सरकारने त्याची सकारात्मक दखल घेत एमपीएससीच्या धर्तीवर पोलीस भरतीचे वार्षिक कॅलेंडर तयार […]

अधिक वाचा..

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): व्यापाऱ्यांना सुरक्षित, भयमुक्त आणि कायद्याचे संरक्षण असलेले वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी (दि. ८) व्यापारी असोसिएशन व विविध व्यावसायिकांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलिसांनी […]

अधिक वाचा..

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय सह-समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले की, राजकारण हे टीव्ही स्टुडिओ किंवा पत्रकार परिषदांपुरते मर्यादित नसून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात लढणे हेच खरे नेतृत्व आहे. सतत पत्रकार […]

अधिक वाचा..