नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. “नारी शक्ती वंदन”च्या नावाखाली प्रत्यक्षात “सत्ता शक्ती वंदन” सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. २८ सप्टेंबर २०२३ रोजी १०६ वी घटनादुरुस्ती करून महिला आरक्षण कायदा मंजूर झाला, हे स्वागतार्ह असले तरी त्याचे संपूर्ण श्रेय […]

अधिक वाचा..

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गांधी भवन, कुलाबा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या प्रशिक्षण सत्रात मुख्य प्रशिक्षक म्हणून असद […]

अधिक वाचा..

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नसून भाजपच्या नेत्याचे वाटले, तसेच ते आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप केला. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपवर राजकीय हेतूने भाषण केल्याचा आरोप केला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात […]

अधिक वाचा..

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi यांच्या राजीनाम्याबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली माहिती पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ एप्रिल रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले. […]

अधिक वाचा..
waghale-krushi-pujan

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय परिवाराच्या वतीने अक्षय तृतीया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील दाम्पत्यांच्या हस्ते शेती व भूमीचे पूजन करून कृषी हीच खरी अक्षय संपत्ती असल्याचा संदेश देण्यात आला. स्वाध्याय परिवाराच्या पुढाकाराने शेती व भूमीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक बैलगाडीची भव्य शोभायात्रा […]

अधिक वाचा..

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे […]

अधिक वाचा..

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करत मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती मिळवली आहे. तिच्या या यशामुळे अरणगाव परिसराततुन सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. निकिता मखर हि आर्थिक अडचणींना सामोरी जात असतानाही शिक्षण आणि करिअरच्या वाटचालीत खंबीरपणे […]

अधिक वाचा..

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. दि. १६ एप्रिल रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यानंतर […]

अधिक वाचा..

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक भेट उत्साहवर्धक ठरली. या वेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा विद्यार्थ्यांशी झालेला संवाद विशेष आकर्षण ठरला. डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत सोप्या भाषेत विधिमंडळाची कार्यपद्धती समजावून सांगताना शिस्त, नियम आणि सभागृहातील कामकाजाची रचना स्पष्ट […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव […]

अधिक वाचा..