जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा मोठ्या पडद्यावर

मुंबई: चेक बाऊंस प्रकरणामुळे तुरुंगात गेलेले विनोदी अभिनेता राजपाल यादव काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आले आहेत. जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून, त्यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुप्रतिक्षित भूत बांगला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान; बदललेली जिल्ह्यांची व बेटांची नावे

औरंगाबाद: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (GK) हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. MPSC, पोलीस भरती, तलाठी तसेच इतर सरकारी परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे बदल आणि माहिती जाणून घेणे आवश्यक असते. अलीकडच्या काळात देशात आणि राज्यात काही जिल्ह्यांची तसेच ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. […]

अधिक वाचा..
sanjay-travel-bus-fire

Video! पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती मंदिरासमोर बस जळून खाक…

शिरूर (संतोष धायबर) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती मंदिरासमोर शुक्रवारी (ता. १३) रात्री साडे आठच्या सुमारास धावत्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागला आणि बस जळून खाक झाली. संजय ट्रॅव्हलची बस पुण्याहून नागपूरकडे जात असताना बसला आग लागली. मात्र बसमधील प्रवाशांनी आणि चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना […]

अधिक वाचा..

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य

1) अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू मसाज करावी.. 2) तर्जनी: आपले लहान आणि मोठे आतडे ह्या बोटाशी निगडित आहे.पोट दुखत असेल तर ह्या बोटाची मसाज करावी. 3) मध्यमा: ह्या बोटाचा संबंध अस्वस्थ, आळशी, आणि टेन्शन ह्याचाशी असतो. त्यामुळे असे वाटल्यास हे बोट हळू हळू मसाज […]

अधिक वाचा..
crime

शिरुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी बनावटीच्या पिस्तुलासह दोन जण ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे गावात भरदिवसा गावठी पिस्तुलासह दोन जण कारमध्ये फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागेश्वर विद्यालयासमोर उभी असलेल्या कारची तपासणी करताच पोलिसांच्या हाती गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी समीर प्रकाश शेलार (वय २३) आणि संतोष गणपत दुर्गे (वय ३५), दोघेही (रा. […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

घोड धरणात अवैध वाळू उपसा; कारवाईच्या नावाखाली आर्थिक तडजोडींचा संशय…? 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील घोड धरण परिसरात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु असून, प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचा केवळ देखावा केला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. कारवाईच्या नावाखाली काही अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांशी आर्थिक तडजोड होत असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत आहे. त्यामुळे अवैध वाळू उपशाचा धंदा दिवसाढवळ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सिंचन साहित्य चोरी प्रकरणाला नवे वळण; आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न…? 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे तसेच रांजणगाव परिसरात ठिबक सिंचन साहित्य चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन साहित्य चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी सुमारे आठवडाभरापूर्वी रांजणगाव पोलीस ठाण्यात […]

अधिक वाचा..

न्हावरे येथे कांदा उत्पादकांचा आक्रोश मेळावा; भारत दिघोळे साधणार शेतकऱ्यांशी थेट संवाद 

निमोणे (तेजस फडके): कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे आणि सरकारच्या सतत बदलणाऱ्या निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारात मिळणारा दर मात्र तोट्याचा ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे हे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये अवैध गोहत्या प्रकरणातील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अवैधपणे गोहत्या करून गोमांस विक्री करणाऱ्या तसेच वारंवार गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका सराईत आरोपीवर कठोर कारवाई करत त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेत अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल केले असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक […]

अधिक वाचा..

औरंगाबादात ‘हायड्रो गांजा’चे जाळे उघड; दोन तरुण अटकेत

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात विदेशी ‘हायड्रो गांजा’ची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखेने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने एन-४ परिसरातील राजवीर चरणसिंग बिरग (२०) आणि ओम रवींद्र शिंदे (२३) यांना मंगळवारी रात्री छावणीतील लोखंडी पुलावर सापळा रचून रंगेहाथ पकडले. राजवीरच्या बॅगेत […]

अधिक वाचा..