मध्यपूर्वेत युद्धाची धग; दुबईत अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला धावले

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते; पण संकटाच्या क्षणी तुम्ही प्रत्यक्ष मदतीला धावून येता, याची खात्री आज पटली,” अशा शब्दांत इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा तरिता शंकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. युद्धजन्य परिस्थितीत दुबई येथे अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने सुरक्षित मायदेशी परत आणल्याबद्दल त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आभार मानले. अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात निर्माण […]

अधिक वाचा..

नागपूर स्फोटप्रकरणी सरकारवर हल्लाबोल; ‘हे हत्याकांडच’;  विजय वडेट्टीवार

मुंबई: नागपूर येथील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २२ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासकीय यंत्रणा आणि कंपनी मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये मद्यपानास ‘शून्य सहनशीलता’

चालक-वाहकांची दररोज अल्कोटेस्ट सक्ती मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत असताना मद्यपानास पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण जाहीर केले आहे. आगारात हजर होणाऱ्या सर्व चालक व वाहकांची दररोज अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी अनिवार्य करण्यात आली असून योग्य नोंदीनंतरच कर्तव्यावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..

बोरीवली तहसीलदार कार्यालयात अधिवास अर्जांचा तुटवडा; विद्यार्थ्यांना झेरॉक्स दुकानाचा आधार

मुंबई: बोरीवली तहसीलदार कार्यालय येथील नागरी सेतू केंद्रात अधिवास प्रमाणपत्र (डॉमिसिले सर्टिफिकेट) अर्ज उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्यानंतर आज सकाळी सुमारे ११.३० वाजता भेट दिली असता केंद्रात छापील अर्ज नसून समोरच्या झेरॉक्स दुकानातून अर्ज घ्यावेत, असे सांगण्यात आले. यावेळी जवळच असलेल्या आशापुरा जंबो झेरॉक्स येथून १० रुपयांना अर्ज विकत […]

अधिक वाचा..

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुलढाणा आणि पुणे (बाणेर) येथे घडलेल्या दोन विवाहितांच्या आत्महत्येच्या घटनांबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदनातून सखोल व निष्पक्ष चौकशीचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही घटना अत्यंत गंभीर व समाजाला काळीमा फासणाऱ्या असल्याचे त्यांनी नमूद केले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस […]

अधिक वाचा..

बांगलादेशी शोध मोहीम की भाजप कार्यकर्त्यांसाठी नवा रोजगार; ॲड. अमोल मातेले यांचा सवाल

मुंबई: मुंबई उपनगरात कथित बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समित्या स्थापन करण्याची घोषणा सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मात्र ही मोहीम खरोखरच बेकायदेशीर नागरिकांविरोधात आहे की भाजप कार्यकर्त्यांना नवे ‘रोजगार’ उपलब्ध करून देण्याचा मार्ग आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेश प्रवक्ते तथा […]

अधिक वाचा..

चेंबूर ते नागपूर! कामगारांच्या रक्तावर उद्योगांचा नफा? कायदे कागदावर, सुरक्षा कुठे?

मुंबई: होळीच्या तोंडावर मुंबईतील चेंबूर परिसरात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून सहा बांधकाम कामगार कोसळले. एकाचा मृत्यू, पाच जखमी. प्राथमिक माहितीनुसार सेफ्टी किट नव्हते. प्रश्न सरळ आहे सुरक्षा नियम फक्त कागदावरच का? बांधकाम कामगारांसाठी २०१५ पासून मंडळे, नोंदणी, कल्याणकारी योजना, विमा, मदत… सर्व काही असल्याचे सांगितले जाते. मग प्रत्यक्ष ठिकाणी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट का नाहीत? अधिकाऱ्यांची तपासणी […]

अधिक वाचा..

शिरूर! सुलभ भिशीच्या नावाखाली पोलीस व नागरिकांना तब्बल ३० कोटींचा गंडा?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. “सुलभ भिसी”च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका महिलेचा कथित कारनामा समोर येत असून, यात बडे पोलिस अधिकारी–कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही तब्बल ३० कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कारेगाव पोलिस स्टेशनमध्ये रोजची हजेरी, पोलिसांशी सलगी, अधूनमधून जेवणावळी, वारंवार भेटीगाठी अशा पद्धतीने संबंधित […]

अधिक वाचा..

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिरूर–मलठण रस्त्याची दुरावस्था कायम; नागरिक संतप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते मलठण दरम्यानचा मुख्य मार्ग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आजही खड्डेमय अवस्थेत असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोंढण ओढ्याच्या जवळ रस्ता अतिशय खराब झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.अनेक वेळा डागडुजी करण्यात आली, निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले; […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरूर तालुक्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंटवर कठोर […]

अधिक वाचा..