गर्भाशयातील गाठी काढण्याच्या नावाखाली गर्भाशयच काढले; पुण्यात त्या हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा

पुणे: गर्भाशयातील गाठ काढण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशयच काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात साई केअर हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांसह पाच जणांविरुद्ध शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई केअर हॉस्पिटलचे डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे […]

अधिक वाचा..

मर्डर मिस्ट्रीने सजलेला ‘तलास’; गौतमी पाटीलच्या धम्माल गाण्याची रंगतदार एन्ट्री

मराठी सिनेसृष्टीत आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांची परंपरा कायम राखत रहस्य आणि रोमांचाचा संगम घडवणारा ‘तलास’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शीर्षकावरून कथानकाचा अंदाज न लागणारा हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवतो. निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक उदय गणपत जाधव यांनी कथा, पटकथा आणि […]

अधिक वाचा..

वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!

वाघोली: अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली. या कारवाईत 28 लाख रुपये किंमतीचे 134 ग्रॅम मेफेड्रोन, मोटार आणि मोबाईल असा एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किशन नंदकिशोर लधड (वय 35, रा. धानोरी) आणि हनुमान रूपाराम चौधरी (वय 33, रा. वडगाव […]

अधिक वाचा..

नांदेड परिक्षेत्रात ‘ऑल आऊट ऑपरेशन’चा धडाका; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात पुकारलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहमदपूर, उमरी, मुदखेड, कळमनुरी, किनगाव आणि गंगाखेड या भागांमध्ये टाकलेल्या धाडीत अवैध वाळू उपसा व जुगार अड्ड्यांवर कारवाई करत सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने नागरिकांना पुराव्यानिशी तक्रारी करण्याचे […]

अधिक वाचा..

बारामतीत स्ट्रॉबेरीचा गोड प्रयोग! निंबुतच्या दीपक जगताप यांचा १० गुंठ्यात लाखोंचा नफा

बारामती: बारामती तालुका म्हटले की उसाची हिरवीगार शेती डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र बारामती तालुक्यातील निंबुत गावात एका प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक चौकटी मोडत थंड प्रदेशातील स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेत नवा आदर्श निर्माण केला आहे. दीपक जगताप यांनी विज्ञानाधारित नियोजन, हवामान व्यवस्थापन आणि अचूक निरीक्षण यांच्या जोरावर हा प्रयोग फळाला आणला. परंपरेपलीकडचा विचार, प्रयोगशीलतेची वाट दीपक जगताप […]

अधिक वाचा..

मालेगाव वादावरून राज्यात तणाव! देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा; अधिकृत भूमिका माझीच

मुंबई: मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. महापालिकेतील दालनात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाऊन हनुमान चालिसा पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भाजप नेते व मंत्री नितेश […]

अधिक वाचा..

जळोची रस्त्यावर २.३५ कोटींचा गांजा जप्त; होळीआधी बारामतीत मोठी कारवाई

बारामती: बारामती शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शहर पोलिसांनी जळोची पिंपळी रस्त्यालगतच्या शेतात दोन टाक्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४७० किलो गांजा शनिवारी (ता. २८) जप्त केला. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच पोलिस निरीक्षक श्रीशैल्य […]

अधिक वाचा..
Kavita-Dhaybar

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील कविता संदीप धायबर यांना महिला सबलीकरण व उन्नतीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो टायर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारादरम्यान कविता धायबर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. […]

अधिक वाचा..

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस […]

अधिक वाचा..
abhinav-vidyalay-saradwadi

शिरूर! अभिनव विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात उल्लेखनीय भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित “शिरूर तालुका शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५/२६” अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी गटामध्ये शिरूर तालुक्यातील अभिनव विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण निकाल आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बळावर विद्यालयाने तालुक्यात आपली […]

अधिक वाचा..