चिंच खाल्ल्याने मुळापासून बरे होतात ‘हे’ रोग

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो तसेच चिंचेच्या उपयोगाने मुळापासून बरे होतात रोग तर जाणून घेवूया उपयोग. चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे.जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे

नागपूर: नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात आहे.. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी शेतकऱ्यांचा नाकारला […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री आणि तत्त्वनिष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विज्ञान शाखेत पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर […]

अधिक वाचा..

चंद्रपुरातील नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची संवेदनशील दखल

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे”; डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे १९७२ मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्याचार प्रकरणातील पीडिता मथुरा ताईंना आजही आयुष्याच्या उत्तरार्धात हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशील दखल घेत स्वतः नवरगावला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. […]

अधिक वाचा..

राज्यातील शिक्षणाचा झाला खेळखंडोबा, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पद मोठ्या प्रमाणावर रिक्त 

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पद लवकरात लवकर भराव्या, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी नागपूर: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे, त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील […]

अधिक वाचा..

करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): करडे (ता. शिरुर) येथील घायतडक वस्तीवर मध्यरात्री उशिरा भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने थेट घराच्या आवारात प्रवेश केला. हा प्रसंग इतका अचानक घडला की घरातील सदस्यांना काही क्षण काय घडत आहे हेच कळेनासे झाले. या बिबट्याने श्वानावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी सुदैवाने घायतडक कुटुंबातील सदस्यांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि […]

अधिक वाचा..

कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मुंबई: भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल […]

अधिक वाचा..

अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी वकिलाला जीवघेणी मारहाण

नागपूर: अवैध वाळू उपसा प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथील तरुण वकील पांडुरंग तोडकर याच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही मारहाण केल्यावर याच वकिलाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांना पांडुरंग तोडकर माहिती देत असल्याच्या संशयाने वाळू माफियांनी हा […]

अधिक वाचा..

सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा

प्रश्नोत्तराच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिली थातुर मातुर उत्तर नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही,सोयाबीनला हमीभाव मिळत नाही याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थातुर मातुर उत्तर दिली यावरून विरोधक संतापले. सरकारने दिलेले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप काँग्रेस […]

अधिक वाचा..

सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या सोहम अभिषेक जाधव यांची चमकदार कामगिरी,शालेय कॅरम स्पर्धेत राज्यस्तरीय निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): क्रीडा युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आयोजित कॅरम स्पर्धा, वयोगट १४ या स्पर्धेसाठी पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून पार पडलेल्या कॅरम स्पर्धा निवड प्रक्रियेतून सोहम अभिषेक जाधव याने उल्लेखनीय यश मिळवून राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी […]

अधिक वाचा..