अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी वकिलाला जीवघेणी मारहाण

महाराष्ट्र

नागपूर: अवैध वाळू उपसा प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथील तरुण वकील पांडुरंग तोडकर याच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही मारहाण केल्यावर याच वकिलाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला.

अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांना पांडुरंग तोडकर माहिती देत असल्याच्या संशयाने वाळू माफियांनी हा हल्ला केला. हा हल्ला इतका मोठा होता की वकिलाला पाच फ्रॅक्चर झाले. अवैध वाळू उपसा करणारे माफिया आता हल्ले करत आहे यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी चौकशी करून कारवाई करतील असे आश्वासन सभागृहात दिले.