विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी विद्यापीठांनी तत्परतेने कार्यवाही करावी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासाला पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्य करावे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात पार […]

अधिक वाचा..

स्वस्तिका घोष यांच्या सुवर्णयशाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात अभिनंदन केले. स्वस्तिका घोष यांनी आपल्या कौशल्यपूर्ण आणि दमदार खेळाच्या जोरावर प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय क्रीडा […]

अधिक वाचा..

पुण्याला २०३२ ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’चे यजमानपद मिळणार? महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच आवश्यक शासन समर्थन, आर्थिक हमी आणि पायाभूत सुविधांबाबत बांधिलकी देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीची दावेदारी आणखी मजबूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार […]

अधिक वाचा..

‘लकी शनिवार’ अन् दादर लोकलमध्ये चोरी! ६५ वर्षीय आज्जीचा पर्दाफाश

मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. दोन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांच्या नजरेत आलेल्या ६५ वर्षीय महिलेचा अखेर पर्दाफाश झाला. पोलिसांनी तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आलेल्या या महिलेला रंगेहात अटक केली. अनघा जोशी असे आरोपी महिलेचे नाव असून, ती मूळची पुण्याची […]

अधिक वाचा..

लावणी हवी, लावणीच्या नावाखालील अश्लीलता नको!

मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे आणि अदाकारीत शतकानुशतकांची सांस्कृतिक परंपरा आहे. तमाशा, लोकनाट्य, वग, लोकसंगीत आणि मेळे या लोककलांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला समृद्ध केले आहे. मात्र, या परंपरेच्या नावाखाली रंगमंचावर आणि सार्वजनिक कार्यक्रमांत सुरू असलेल्या काही प्रकारांकडे पाहिले की प्रश्न पडतो—ही लावणी आहे की लावणीच्या […]

अधिक वाचा..

गडचिरोलीतील क्रीडा विकासाला बूस्टर; ८०.१२ कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई: नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील युवकांना क्रीडा क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यासाठी टप्पा-२ अंतर्गत ८०.१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ही माहिती दिली. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील खेळाडूंना दर्जेदार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; धर्मांतरासाठी 60 दिवस आधी सूचना बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भातील राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या मार्च 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेसह विधान परिषदेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. जबरदस्ती, […]

अधिक वाचा..

मुंबईत राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला गती

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबईस्थित कोल्हापूरकरांची गेल्या ५० वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन विधान भवनात उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली. स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून त्याबाबत तत्काळ मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री […]

अधिक वाचा..

मनोहर मामा भोसले प्रकरणात नवा ट्विस्ट; शिक्षण क्षेत्रातील दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर मामा भोसले प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कथितरित्या जमा झालेल्या पैशांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिस तपासातून समोर आला आहे. या प्रकरणात करमाळ्यातील दत्तकला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..

ग्रामसभेतील गोंधळानंतर ग्रामसेवकाचा मृत्यू; सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पारोळा : शिवरे दीगर येथे १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, ज्ञानेश्वर अशोक पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांत सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवरे दीगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा १७ ऑगस्ट […]

अधिक वाचा..