वंदे मातरमच्या वादावरून भाजपवर सपकाळांचा निशाणा; ‘हिंदू-मुस्लीम वाद उकरण्याचे षडयंत्र’

मुंबई: देशातील राजकीय वातावरण बदलले असून जनता आता भाजपा-मोदी-शाह सरकारला प्रश्न विचारत आहे. त्यामुळे सरकार घाबरले असून सांगण्यासारखे काही नसल्याने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार साजीद खान पठाण यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. […]

अधिक वाचा..

उबाठाला मोठा धक्का! सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे. उबाठा गटाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अमित भाद्रीचा, आशिष पढयार, विनायक […]

अधिक वाचा..

जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिला. जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा नागवडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोरात कठोर […]

अधिक वाचा..

सीओईपीच्या शुल्क रचनेत सुधारणा; विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिक लाभ मिळणार

मुंबई : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यापीठाने जाहीर केलेल्या शुल्क रचनेबाबत विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १८) […]

अधिक वाचा..

लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करून मान- पाठ आखडून जाते, ३ प्रकारचे स्ट्रेचिंग करा अंग मोकळं होईल

ज्यांना ८- ९ तास सतत लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करावं लागतं अशा तरुण पिढीला मान- पाठ- कंबर आखडून जाण्याचा त्रास वाढला आहे. दिवसातला जास्तीतास्त वेळ बसून काम करायचं, त्यात पुन्हा दुचाकी, चारचाकी गाडी चालविण्याचं वाढलेलं प्रमाण, त्यातही रस्त्यावरचे खड्डे टाळत केलेला प्रवास, यामुळे अंग जास्त आखडून जातं. मान, पाठ, कंबर गळून जाते. वारंवार दुखते. हा त्रास […]

अधिक वाचा..

दालचिनी खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

दालचिनी ही एक नैसर्गिक औषधी मसाला आहे, ज्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. विशेषतः घसा खवखवत असल्यास, आवाज बसल्यास किंवा खोकला असल्यास, दालचिनीचा छोटा तुकडा चघळणे हा एक घरगुती प्रभावी उपाय आहे. दालचिनी चघळण्याचे फायदे १) घशातील कफ मोकळा होतो: दालचिनी मध्ये गरम प्रकृतीचे घटक असल्यामुळे घशातील साचलेला कफ सहज मोकळा होतो. २) आवाज […]

अधिक वाचा..

फंगल इन्फेक्शनचा त्रास

झपाट्यानं वाढणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात त्वचेची आणि स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर ह्या आजाराला तुम्ही निमंत्रण देऊ शकता. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही घरगुती उपाय तुम्ही पर्यायी म्हणून करू शकता. कडुनिंब: कडुनिंब हे बुरशी मारण्यासाठी उत्तम औषध आहे. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकावा. त्या पाण्यानं […]

अधिक वाचा..

शहरांच्या बकालपणाला सरकारच जबाबदार; काँग्रेसचा ‘शहर परिवर्तन गट’ २० ऑगस्टपासून मैदानात

मुंबई: राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सरकार व महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. योग्य नियोजनाअभावी राज्यातील अनेक शहरे बकाल होत असून नागरिकांना रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे. शहर विकासाच्या […]

अधिक वाचा..

आमदारांच्या स्वीय सहाय्यक, वाहनचालकांच्या मानधनात मोठी वाढ; १ ऑगस्टपासून लागू

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात राज्य शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वीय सहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजारांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मानधन २० हजारांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. ही वाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी […]

अधिक वाचा..

‘महा वॉकेथॉन २०२६’मध्ये संजय दत्त यांचा सहभाग; २१ ऑगस्टला राज्यातील ३६ जिल्ह्यांत आयोजन

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या राज्यव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेते संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी निमंत्रित केले असून, […]

अधिक वाचा..