मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात मोठी वाढ; मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा फडणवीसांना अधिकार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात महत्त्वाची वाढ करणारे ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६’ राज्य सरकारने अधिसूचित केले आहेत. नव्या नियमांनुसार, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना आणि शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. नव्या नियमांमुळे मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांना थेट हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. […]

अधिक वाचा..

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला आव्हान

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू झालेला राजकीय वाद आता उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचणार आहे. बहुमत नसतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीवर अपेक्षित वेगाने सुनावणी होत नसल्याने आता उच्च न्यायालयात याचिका […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत कारेश्वर भिशीच्या नावाखाली ३९ जणांना २० कोटींचा गंडा

शिरुर (तेजस फडके): कारेश्वर बी.सी. मंडळाच्या नावाखाली भिशी चालवून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ३९ गुंतवणूकदारांकडून २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार कारेगाव (शिरुर) येथे समोर आला आहे. भिशी बंद पडल्याचे सांगून गुंतवणूकदारांनी वारंवार मागणी करुनही रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यात SIR चे काम 100 टक्के पूर्ण

ठाणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे 100 टक्के EF प्रिंट काढण्यात आले आहे. त्यानंतर […]

अधिक वाचा..

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: राज्यातील एसटी बसस्थानके आणि एसटी प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. बसस्थानकांवरील सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत. विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम […]

अधिक वाचा..

जुन्नरमध्ये चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश

मुंबई: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष बराच काळ प्रलंबित असलेले एखादे महत्त्वाचे काम आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य व्यक्तीची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक निर्णय घेता येईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. वृषभ आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी योग्य मार्ग सापडू शकतो. व्यवसायातील एखादा व्यवहार अपेक्षेप्रमाणे होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. घरातून एखादी चांगली बातमी […]

अधिक वाचा..

गावाजवळ उद्योग, युवकांच्या हाताला काम; ग्रामीण महाराष्ट्रासाठी ‘वन तालुका–वन इंडस्ट्रियल क्लस्टर’ची गरज

मुंबई : महाराष्ट्राची औद्योगिक वाटचाल देशात आघाडीवर असली, तरी या प्रगतीचा समान लाभ ग्रामीण महाराष्ट्राला मिळालेला नाही. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या औद्योगिक पट्ट्यांमध्ये गुंतवणूक व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असताना मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि राज्यातील अनेक ग्रामीण तालुक्यांमध्ये स्थानिक रोजगाराच्या संधींची कमतरता कायम आहे. परिणामी शिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये २२ लाखांचे MD ड्रग जप्त; दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

शिरुर (तेजस फडके) शिरुर परिसरात अंमली पदार्थांच्या बेकायदा विक्रीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत ११० ग्रॅम वजनाचा सुमारे २२ लाख रुपये किमतीचा एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला. मलठण येथील राजवाडा चौक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत एम डी ची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोटारसायकलसह […]

अधिक वाचा..

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कोंडीने उद्योगांना स्थलांतराची भीती; मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोरेगाव भीमा : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना बसत आहे. वाहतूक कोंडीवर वेळीच कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास चाकणप्रमाणे या परिसरातील उद्योगांनाही स्थलांतराचा विचार करावा लागू शकतो, अशी भीती इंडस्ट्रीअल फेडरेशन ऑफ महाराष्ट्रने व्यक्त केली आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी […]

अधिक वाचा..