विदेशी दारु महागल्याने ‘देशी’ला आले अच्छे दिन

कोल्हापूर: राज्याच्या तीजोरीत महसुलाचा ओघ वाढवण्यासाठी सरकारने विदेशी दारूवर लादलेली जबर करवाढ आता उलटी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करवाढीमुळे विदेशी दारूच्या किमती प्रचंड वाढल्याने अनेक तळीरामांनी आपला मोर्चा स्वस्त आणि आकर्षक बनलेल्या ‘देशी’कडे वळवला आहे. परिणामी, राज्यभरातील बार आणि परमिट रूममधील विदेशी दारूची विक्री निम्म्याहून अधिक घटली असून, शासनाचा महसूल वाढवण्याचा हेतूच विफल होण्याची […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यदिनी शाळेत आलेल्या आठवीतील मुलीचे अपहरण; तरुण 24 तासात गजाआड 

सोलापूर: स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कराड येथून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत त्या मुलीसह तरुणाला शोधले. सिद्राम बुक्का (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे रहायला […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम साजरे; आजी आजोबांनी अनुभवला अनुपम सोहळा

सिंधुदुर्ग: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्या निमित्त विविध उपक्रम आणि सण साजरे करण्यात आले. यामध्ये सर्व आजी आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आजी आजोबांच्या दाताची काळजी घेण्यासाठी फिरता दंत चिकित्स शिबिराचे आयोजन करून त्यांच्या दातांची तपासणी रूट कॅनल, दात काढणे, दात साफ करणे, सिमेंट भरणे या गोष्टी केल्या गेल्या. याशिवाय, डॉ किसन गारगोटे व त्यांचे […]

अधिक वाचा..

एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

मुंबई: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केल्याची घोषणा करण्यात आली. एनडीएच्या संसदीय मंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राधाकृष्णन यांच्या निवडीमागे अनेक राजकीय आणि धोरणात्मक समीकरणे असल्याचे दिसून येते. उमेदवारीमागील प्रमुख कारणे एनडीएने […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजसा दिवस कसा असेल 

मेष: आज भाग्य तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल आणि यश मिळेल. तुमच्या व्यवसायात योजनांशी संबंधित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आणि पेमेंट मिळाल्यानंतर रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. भूतकाळात तुम्हाला लाभ मिळतील. आज ज्या काही घटना घडतील त्या तुमच्यासाठी अनुकूल असतील. वृषभ: […]

अधिक वाचा..

आयटम साँग, प्रौढ संगीत मुलांना लवकर मॅच्यूअर बनवून भावनांनाही हानी पोहचवतात

आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या युगात आयटम साँग आणि प्रौढ स्वरुपाचं संगीत प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं. शाळकरी मुलं, अगदी ७-८ वर्षांची लहान मुलंसुद्धा अशा गाण्यांवर थिरकत असल्याचं आपण रोजच पाहतो. परंतु या गाण्यांचा मुलांच्या निष्पाप मनावर होणारा परिणाम अनेकदा पालकांच्या लक्षातच येत नाही. मुलं वयाच्या आधी मोठी होतात तज्ज्ञांच्या मते अशा गाण्यांमध्ये वापरले जाणारे द्वयर्थी शब्द, अत्याधिक […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी वडगाव रासाई खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या १२ तासांत केली अटक 

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे दारु पाजण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर अवघ्या १२ तासांच्या आत शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता वडगाव रासाई गावातील सृष्टी हॉटेलजवळील अंबिका पानटपरीसमोर अविनाश उर्फ […]

अधिक वाचा..

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एनजी आचार्य आणि डी.के. मराठे कॉलेज माजी विद्यार्थी संघटने’ चे सहकार्य  मुंबई: ‘लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स’ आणि ‘सुमनालय फाउंडेशन’ च्या वतीने नुकतेच चेंबुर येथील ‘एनजी आचार्य आणि डी.के. मराठे कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटने’ च्या सहकार्याने आचार्य मराठे कॉलेजच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे नियोजन डॉ. […]

अधिक वाचा..

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला

मुंबई: शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. शासनाच्या (दि. २) मे २०२५ च्या पत्रान्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा […]

अधिक वाचा..

इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत जयंतराव पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट

‘ईश्वरपूर’ नामांतर करताना ‘उरूण’चाही समावेश व्हावा यासाठी शासनाला निर्देश द्यावेत; जयंतराव पाटील यांची राज्यपालांकडे मागणी मुंबई: इस्लामपूरच्या नामांतराच्या विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांनी आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेतली. या दरम्यान त्यांनी राज्यपाल महोदयांना निवेदनही दिले आहे. जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबत माहिती […]

अधिक वाचा..