राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत

राज्यात महिला पोलिसच सुरक्षित नसतील आणि तेही भाजप पदाधिकारी विनयभंग करत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था उरली का? नागपूर: राज्य एकीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडण्याची आवश्यकता होती का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला […]

अधिक वाचा..

पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र व काँग्रेसची भूमिका एकच मुंबई: पहिलीपासून हिंदी भाषा लादण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अशा प्रकारे लादले जाणारे अन्यायकारक भाषा धोरण खपवून घेतले जाणार नाही असे ठणकावत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

आणीबाणीला RSS सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन, देवरसांची भूमिका भाजपाला मान्य नाही का

इंदिराजींचा आणीबाणीचा निर्णय संविधानिक, पण ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? मुंबई: देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस […]

अधिक वाचा..

तुकडेबंदी हरणार? सरकार आणणार नवा ‘गुंठेवारी कायदा’! जाणून घ्या सविस्तर माहिती

संभाजीनगर: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात जमिनीचे तुकडे पाडण्यावर असलेली तुकडेबंदी (Fragmentation Ban) कायद्यातून हटवण्याचा सरकारचा विचार आहे. महायुती सरकार लवकरच नवा गुंठेवारी कायदा पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा आता एक गुंठा जमीन देखील स्वतंत्ररित्या तुकड्यांत पाडता येणार आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

अधिक वाचा..

तलाठ्यांच्या मनमानी कारभाराने शिरूर तालुक्यातील नागरिक त्रस्त

ग्राम महसूल अधिकारी निवासी दाखवा आणि बक्षीस मिळवा… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अनेक ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) सजाच्या ठिकाणी राहत नसून ते पुणे, वाघोली परिसरात राहत असल्याने वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे किंवा उशिरा येण्याने वारसनोंदी, खरेदीखताच्या नोंदी, ७/१२ उतारे आदी महत्त्वाच्या महसुली कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. यापैकी काही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीला; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीवरुन कंपनीची अंदाजे 10 हजार रुपये किंमतीची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे ओमकार अरुण शहाणे (वय 24, व्यवसाय शेती, रा. निर्वी, ता. शिरूर, जि. पुणे) […]

अधिक वाचा..

हिंदी भाषा सक्तीच्या या एकांगी निर्णयाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा विरोध

पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेचा आग्रह करणे अन्यायकारक रत्नागिरी: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने सुद्धा आता काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी व CET निकाल लागूनही अद्याप प्रवेश सुरू नाही

राज्य शासनाच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त इशारा मुंबई: राज्यातील दहावी व बारावीचे निकाल लागून दीड महिना उलटून गेला असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक CET परीक्षांचे निकालही महिन्याभरापूर्वी जाहीर झाले आहेत. तरीदेखील, अकरावी, तंत्रनिकेतन पदविका, पॉलिटेक्निक, ITI व 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा एकही टप्पा पूर्ण झालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर व […]

अधिक वाचा..

बळीराजाला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो

पुणे: राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ, ही मतचोरीच आहे

मतचोरीची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुलजी गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ […]

अधिक वाचा..