Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडूनच लाथा बुक्क्यानी व गजाने बेदम मारहाण करत त्यांचा हात मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ चे कलम ४ , २४ अन्वये […]

अधिक वाचा..
shikrapur-missing-girl

शिक्रापूरमध्ये सजग नागरिकांमुळे वाट चुकलेल्या दोन चिमुकल्या पालकांच्या स्वाधीन!

शिक्रापूरः शिक्रापूरमध्ये (ता. शिरूर) दोन चिमुकल्या सायंकाळच्या सुमारास घराची वाट चुकल्यामुळे घाबरल्या होत्या. घरचा रस्ताही त्यांना सांगता येत नव्हता. अंधार पडू लागल्यामुळे त्या कावऱ्या-बावऱ्या होऊन रडू लागल्या होत्या. पण, शिक्रापूरमधील सजग नागरिकांमुळे काही तासातच कुटुंबियांचा शोध घेऊन चिमुकल्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलींना पाहून आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. शिक्रापूरमधील मलठण फाट्यावरील सिद्धीविनायक परिसरात ही घटना […]

अधिक वाचा..

या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा

कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत महायुती सरकारकडून ४१ कोटींचा भ्रष्टाचार मुंबई: तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शिर्षका खाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ […]

अधिक वाचा..

सरकारची इभ्रत वाचवायची असेल तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा; विजय वडेट्टीवार

गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करू नये नागपूर: महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..

आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण

आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]

अधिक वाचा..

मराठी साहित्य, अजरामर करणारे वरदान 

उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा, सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवे मुंबई: मराठी साहित्य भाषा अजरामर करणारे वरदान आहे.मुलामुलींची उमेद,धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचायला द्या,वाचन संस्कृती वाढवा” असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले . उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेचा कोटींचा अर्थसंकल्प तरीही हाती सत्ता नाही, पण खर्चाला उधळपट्टी

मुंबई: मुंबई महानगरपालिका सध्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासकीय ताब्यात आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेचा तब्बल ₹74,427 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला. पण हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असून, मुंबईकरांच्या विकासापेक्षा सत्ताधारी भाजपच्या आगामी निवडणुकीच्या गणिताचा भाग वाटतो. हे एकहाती निर्णय की मुंबईकरांच्या भावनांवर घाला मुंबई महानगरपालिकेवर लोकशाही नसून प्रशासकीय राजवट आहे. याचा फायदा घेत सत्ताधारी पक्षाने […]

अधिक वाचा..

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई: युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. वाचनातून प्रगल्भता येते. विविध विषयांतील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर […]

अधिक वाचा..

मराठी ही सामर्थ्यशाली भाषा आहे मराठी भाषिकांवरील अन्याय, दादागिरी सहन केली जाणार नाही

मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ चे मराठी भाषा व उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत आणि उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांच्या हस्ते उदघाटन मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य , जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर यांच्या वतीने ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या ५व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे

मुंबई: महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी,सर जे.जे. कला, वास्तू कला व अभिकल्प […]

अधिक वाचा..