mauli katke

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांची वाढली धाकधूक…

शिरूर (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून शिरूर-हवेली मतदार संघासाठी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, वाघोली येथील ‘मयूरी गार्डन’ने माऊली कटके यांची धाकधूक वाढवली असल्याचे दिसत आहे. वाघोली (ता. हवेली) येथील ०.४३ गुंठ्यात २०१४ मध्ये उभारलेल्या मयूरी गार्डन या गृहप्रकल्पातील सदनिका ग्राहकांना विकल्या. मात्र, खरेदी केलेल्या जागेचे हस्तांतरणच […]

अधिक वाचा..
chakan-police

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर लाखो रुपयांची रोकड जप्त…

शिरूर : चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून जात असलेल्या कारमधून तब्बल ३६ लाख ३९ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. बुधवारी (ता. ६) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी चाकण-शिक्रपूर रस्त्यावर अचानक नाकाबंदी लावली. त्यावेळी एका संशयित इनोव्हा मोटारीच तपासणी करण्यात आली. […]

अधिक वाचा..
shirur-vidhan-sabha-2024 leader

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

शिरुर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव, शिरूर-हवेली मतदार संघामधील नागरिकांच्या समस्या आणि राजकीय नेत्यांबद्दलचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिकांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स सुद्धा प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान […]

अधिक वाचा..

कोण म्हणतं फक्त बिट खाऊन रक्त वाढत

लोहाच्या कमतरता जाणवत असल्यास कोणते पदार्थ खावेत? पालक:- लोहाची कमतरता जाणवल्यास आहारात पालकाचा समावेश करा. हे ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करते. पालक हे व्हिटॅमिन सी आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत आहे. जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. बीटरूट:- बीटरूट हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असतेच, पण त्यात पोटॅशियम आणि […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील 10 घोषणा 1. लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन! 2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन! 3. प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला […]

अधिक वाचा..

डास, माश्यांमुळे झालात हैराण! तर घराभोवती ‘ही’ झाडे लावा डासांपासून होईल मुक्ती

गवती चहा:- गवती चहाला थोडा उग्र वास असतो, ज्यामुळे डास पळून जातात. त्यामुळे गवती चहाचे रोपटे घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ ठेवा. हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. झेंडू:- झेंडूची फुले तुमच्या घराच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच पण ते डास आणि इतर कीटकांनाही दूर ठेवतात. या वनस्पतीतून येणारा वास हा पायरेथ्रम, सॅपोनिन, स्कोपोलेटिन, कॅडिनॉल आणि इतर […]

अधिक वाचा..

सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण, पहा डेंग्यू होण्याची कारणे

डेंग्यू कशाने होतो  फ्लॅव्हिव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हे विषाणू डेंग्यू -१ ते डेंग्यू -४ अशा चार उपजातींत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो. एडिस एजिप्ती या डासांचे आयुष्य साधारणपणे ४ आठवडे असते. […]

अधिक वाचा..

सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक करण्याचा प्रयत्न केला जाईल

मुंबई: अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक […]

अधिक वाचा..

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी दीक्षा भूमीला अभिवादन करणार: आमदार अभिजित वंजारी

नागपूर: संविधान वाचविण्यासाठी सुरु असलेला लढा बुलंद करण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी उपस्थित राहणार आहेत. नागपूरात आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दीक्षा भूमीला अभिवादन करणार असल्याची माहिती आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली. वंजारी म्हणाले की, उद्या नागपूर येथे राष्ट्रीय नेते राहुल गांधी येत आहेत. […]

अधिक वाचा..

राज्यात ८५ वर्षांवरील १२ लाखांहून अधिक मतदार

मुंबई: राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १२ लाखांहून अधिक आहे. या वयोगटात एकूण […]

अधिक वाचा..