कोण म्हणतं फक्त बिट खाऊन रक्त वाढत

आरोग्य

लोहाच्या कमतरता जाणवत असल्यास कोणते पदार्थ खावेत?

पालक:- लोहाची कमतरता जाणवल्यास आहारात पालकाचा समावेश करा. हे ॲनिमियावर उपचार करण्यास मदत करते. पालक हे व्हिटॅमिन सी आणि फोलेटचा उत्तम स्त्रोत आहे. जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते.

बीटरूट:- बीटरूट हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. यात लोहाचे प्रमाण जास्त असतेच, पण त्यात पोटॅशियम आणि फायबर तसेच फॉलिक ॲसिड देखील असते. यासाठी बीटरूटचा रस प्या किंवा त्याच्या पानांपासून भाजी तयार करून खा.

खजूर:- खजुरामध्येही लोहाचे प्रमाण जास्त असते. यात लोह, मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्व हे पोषक घटक असते. आपण दिवसभरात दोन – तीन खजूर खाऊ शकता. यामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि लोहाची पातळीही वाढते.

दुधी भोपळा:- अशक्तपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी दुधी भोपळा बेस्ट आहे. दुधी भोपळ्याचा रस किंवा भाजी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यात लोह आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

रताळे:- रताळ्याच्या अर्धा कप सर्व्हिंगमध्ये २.५ मिलीग्राम लोह असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आपण रताळे उकळून किंवा विविध पदार्थांमध्ये घालून खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)