देहविक्रीच्या दलदलीत 12 वर्षाची चिमुकली कशी अडकली

मुंबई: मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी दुष्कृत्य केल्याची माहिती दिली. १२ वर्षीय चिमुकली […]

अधिक वाचा..

बायकोने प्रियकरासोबत नवऱ्याला संपवलं; 13 वर्षाच्या मुलीने पाहिल अन्…

मुंबई: मुंबईच्या अरे कॉलनीत 15 जुलैची रात्र…बाहेर पावसाचा हलका सडा, अंधारात झाडांची सळसळ, आणि एका साध्या घरात घडत होता एक असामान्य प्रसंग…. जो पुढे एका हत्येच्या थरारक कथेत परिवर्तित होणार होता. भरत लक्ष्मण अहिरे, (वय 40), व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट मेहनती, स्वाभिमानी पण घरगुती जीवनात काही काळापासून अस्वस्थता कारण, पत्नी राजश्री अहिरे हिच्या वागण्यातले बदल. तिच्या […]

अधिक वाचा..

रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर नवऱ्याने दिली जीवे मारण्याची धमकी, विवाहितेने काही तसातच संपवल जीवन

पुणे: पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना घडली आहे. रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच अवघ्या काही तासात 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या ने मानसिक शारीरिक छळ करून वारंवार पैशाची मागणी केल्याचा […]

अधिक वाचा..

जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलानेही संपवले जीवन

लातूर: जमीन विकून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईची ६ जुलै रोजी हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर मुलानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.७) रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या अनुषंगाने रेणापूर पोलिस […]

अधिक वाचा..

पुण्यात जादूटोण्यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ

पुणे: सासरच्या लोकांनी अघोरी प्रथा पाळून एका २२ वर्षीय विवाहितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री विवाहितेस नग्न होऊन झोपण्यास भाग पाडणे, मुलावर संशय घेऊन अघोरी चाचणी घेण्यास भाग पाडणे यांसारखे प्रकार तिच्यासोबत घडल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध […]

अधिक वाचा..

खंडणी मागणारे पाच पोलिस कर्मचारी निलंबित

बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली. पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध […]

अधिक वाचा..

गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून छातीत ठोसा मारला अन्…

पुणे: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने दुसऱ्याच्या छातीत जोरात ठोसा मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.६) सायंकाळी लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सागर राजू अवघडे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सूरज […]

अधिक वाचा..

7 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार…

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत […]

अधिक वाचा..

बेट भागात शेतकऱ्यांच्या पशुधनावर चोरांचा डोळा; म्हैस व शेळ्यांची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील माळवाडी येथून मंगळवारी (दि. ५) रात्री चोरांनी दोन शेळ्यांची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी अविनाश लक्ष्मण भाकरे (वय ३५), रा. माळवाडी, टाकळी हाजी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भाकरे यांच्या शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या असताना, चोरांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. चोरून नेलेल्या शेळ्यांची एकूण किंमत अंदाजे […]

अधिक वाचा..

उभ्या असलेल्या टेम्पोतून 53 हजाराचा पॉपकॉर्नचा साठा चोरीला, अज्ञात चोरांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुरावनगर भागात उभ्या असलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्याने तब्बल 53 हजार 532 रुपयांचा पॉपकॉर्नचा साठा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी दत्तात्रय भाउसाहेब देवकर (वय ३१) व्यवसाय – चालक, रा. चांडोली गाव, ता. खेड, जि. पुणे यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, ही चोरी ६ ऑगस्ट रोजी […]

अधिक वाचा..