Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावात जमीनीचा ताबा घेण्याच्या वादातुन एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाचे कथानक शोभेल अशी सिनेस्टाईल हाणामारी झाली. न्यायालयात खटला प्रलंबित असलेल्या शेतीचा ताबा घेण्यासाठी जबरदस्तीने शेतात घुसून ट्रॅक्टरने पिके उध्वस्त केली गेली. तसेच विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला आणि महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात काशीनाथ भाकरे […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांचा जीव गेला पण मुख्यमंत्री मात्र कबुतरांसाठी वेळ काढतात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

बिबट्याच्या हल्ल्यांवर ठोस कृती आराखड्याची मागणी जनआंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षांची शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही अशाच घटनेत आणखी एका चिमुकल्याचा […]

अधिक वाचा..

शिरूरचा सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही साखरझोपेत; पाऊस थांबला तरी रस्त्यांवरील खड्डे कायम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम शिरूर यांच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा संपत आला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अजूनही साखरझोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, अंतर्गत गाव रस्ते, तसेच शिरूर शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे मुख्य मार्ग हे अक्षरशः खड्ड्यांमध्ये विलीन झाले आहेत. वाहनधारकांना रोज जीव मुठीत […]

अधिक वाचा..

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्याचे राजकारण एकेकाळी दर्जा, संयम आणि सुसंस्कृततेचे प्रतीक मानले जात होते. माजी मंत्री स्व. बापूसाहेब थिटे, स्व. रावसाहेब पवार, लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे, काकासाहेब पलांडे, पोपटराव गावडे, आणि अशोक पवार यांसारख्या नेत्यांनी विरोधकांनाही आपलेसे करत संवाद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या संस्कृतीला जपले. मात्र काही नेत्यांनी सध्या सुडाच राजकारण करत कार्यकर्त्यांना […]

अधिक वाचा..

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आज दि १३ ऑक्टोबर २०२५ आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने ही सोडत घेण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी नागरिक व इच्छुक प्रतिनिधींची उपस्थिती अत्यल्प होती. ज्यामुळे या सोडतीबाबत “उदासीनतेचे” वातावरण […]

अधिक वाचा..

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही ‘दत्तक’ गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गुनाट हे गाव विद्यमान आमदार माऊली कटके यांनी काही महिन्यांपुर्वी मोठ्या गाजतवाजत ‘दत्तक’ घेतल्याची घोषणा करत “गावाचा सर्वांगीण विकास करणार” असा शब्द दिला होता. पण आज या दत्तक गावातील स्मशानभुमी मात्र अंधार, दुर्गंधी आणि दुर्लक्षाचे प्रतीक बनली आहे. रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुनाट येथील थोरात कुटुंबातील एका वृद्ध […]

अधिक वाचा..

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी आणि श्रीगोंदा तालुक्यातील बोरी या दोन गावांना जोडणाऱ्या घोडनदीवर ७५ वर्षे होऊन अद्यापही दळणवळणासाठी कायमस्वरुपी पुल नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रोज याठिकाणी प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. घोड धरणातुन पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर  या दोन्ही गावांमधील संपर्क पुर्णपणे तुटतो. चिंचणी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज रविवार दि १२ ऑक्टोबर २०२५ सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण परीसर हादरला आहे. आज सकाळी ९:४५ च्या सुमारास भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे (वय ५ वर्षे ६ महिने) या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी तिचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम […]

अधिक वाचा..

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून; आरोपी २ तासांत पोलिसांच्या ताब्यात

शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, केवळ दोन तासांच्या आत आरोपींना शिरूर डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर–तर्डोबाची वाडी–गोलेगाव–निमोणे–गुनाट–निर्वी, शिंदोडी तसेच शिरूर–रामलिंग–आण्णापूर या मार्गांवर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यांचे अक्षरशः “खड्ड्यांचे साम्राज्य” निर्माण झाले आहे. वाहनधारकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास […]

अधिक वाचा..