crime

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव (ता. शिरुर) हद्दीतील बाजारतळा जवळील एका हॉटेल मध्ये पाच जणांनी बेकायदा जमाव जमवून दोन युवकांना जबरदस्ती रिक्षात बसवुन रांजणगाव औद्योगिक वसाहती (Ranjangaon MIDC) मधील मोकळ्या जागेतील एका कंपनीच्या आवारात नेऊन दोन युवकांना हाताने, लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच कोयते, कुर्‍हाडी, हातात घेऊन हवेत फिरवून आरडाओरड करुन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बजरंग दलाच्या गोरक्षकांमुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गोवंशांना जीवदान; तीन जणांवर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात कत्तलीसाठी जाणाऱ्या 5 जनावरांना वाचविण्यात शिरुर तालुक्यांतील बजरंग दलाच्या गोरक्षकांना यश आले असुन चारचाकी मालवाहू टेम्पोच्या चालकासह दोन जणांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि 27 मे 2024 रोजी सकाळी 11 च्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल 100 टक्के लागला आहे. त्यात शिरुर शहरातील 5 शाळांचा समावेश आहे. तर शिरुर तालुक्याचा एकुण निकाल 97.43 टक्के लागल्याची माहिती शिरुरचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली आहे.   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु असुन याबाबत महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर तलाठी व पोलिसांनी शिंदोडी येथे भेट दिली. परंतु प्रशासनाची लोक पाठमोरे होताच मस्तवाल झालेल्या मातीचोरांनी बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु केला. त्यामुळे मातीचोरांना कुणाचीही भीती राहीली नसल्याचे चित्र सध्या दिसत […]

अधिक वाचा..
mahaganpati

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज (रविवार) संकष्टी निमित्त अलोट गर्दी केली होती. संकष्टी निमित्त आज पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने रांजणगावला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती. परंतु नंतर सोशल मिडीयावर नेटीझन्सने हे प्रकरण उचलुन धरल्यावर मात्र त्या मुलासह […]

अधिक वाचा..
aaryan-aayush-navale

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०, दोघे, रा. राहू, ता. दौंड) अशी मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. बुधवारी (ता. २२) […]

अधिक वाचा..

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वडा पाव, कच्छी दाबेली, ओली भेळ तसेच इतर फास्ट फूड खाण्यासाठी हातगाड्या उभ्या असतात. तसेच पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावात स्वीट होमचा सुळसुळाट झाला असुन यामध्ये मोठया प्रमाणात फास्ट फुड, जंक फुडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ […]

अधिक वाचा..
shikrapur-tanker-fire

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. गॅस कंटेनरने पेट घेतल्याने दोन ते तीन कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याशिवाय एक हॉटेल आणि तीन घरांना मोठी आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र ही घटना गॅस चोरी करताना घडल्याचं समोर आलं […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार करत त्यांना मध्यप्रदेशतील त्यांच्या कुटुंबाकडे पुनः सोपवण्यात आल्याने महीलांसह कुटुंबीयांनी माहेर संस्थेचे आभार मानले यातील एका महिलेला मृत समजुन तिच्या कुटुंबीयांनी तर महिलेला मृत समजून सर्व विधीही केले होते. परंतु माहेर संस्थेमुळे या दोनही महिलांची पुन्हा कुटुंबासोबत भेट झाली.   […]

अधिक वाचा..