शिक्रापुरात धुमश्चक्री; पोलिसांच्या फायरिंगमध्ये आरोपी ठार

शिक्रापुर (तेजस फडके) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात आज शनिवार (दि ३०) रोजी सायंकाळी थरारक घटना घडली. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलिस पथक अटक करायचा प्रयत्न असताना संशयित आरोपीने अचानक चाकू काढून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला असुन त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्या विरोधात तब्बल नऊ गावांच्या ग्रामस्थांचे लेखी निवेदन

निवासस्थानी न राहणाऱ्या डॉक्टरच्या बदलीची केली मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ‘आरोग्य’ नावालाच शिल्लक राहिले असून हे केंद्र अक्षरशः मृत्यूचं घर बनले आहे. वैद्यकीय अधिकारी नेमलेले असूनही एक अधिकारी सरकारी निवासस्थानात न राहता बाहेर मजेत मौजमजा करतात. सकाळी काही तास ‘हजेरी’ लावतात आणि दुपारी केंद्र सोडून निघून जातात. त्यामुळे […]

अधिक वाचा..

Video; प्लॉटिंगसाठी जीव धोक्यात घालुन २२ के व्ही लाईटच्या पोलवर जाहिरातबाजी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात प्लॉटिंगचे प्रमाण वाढले असुन प्लॉटिंगच्या जाहिरातीसाठी भर पाऊसात २२ के व्ही विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या विजेच्या खांबाला लोखंडी शिडीचा वापर करत ‘वृंदावन सिटी’ या प्लॉटिंगच्या जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यासाठी जीव धोक्यात घालत दोन कामगारांनी फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार करडे-कारेगाव रस्त्यावर आज (दि २९) रोजी दुपारी २:३० च्या […]

अधिक वाचा..

Video; ठेकेदाराचा अजब कारभार; भर पाऊसात करडे-कारेगाव रस्त्याची डागडुजी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याचे गेल्या सहा महिन्यांपुर्वी काम झाले होते. परंतु सहा महिन्यानंतर हा रस्ता उखडन्यास सुरुवात झाली असुन ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. आज (दि २९) रोजी दिवसभर पाऊस चालु होता. त्या भर पाऊसात ठेकेदाराने रस्त्याची डागडुजी चालु केली असल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त करत एवढया दिवस ठेकेदार काय झोपा काढत होता […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये भरधाव टेम्पोने शेतकऱ्याला उडवले; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे (कुऱ्हाडवाडी) येथील रहिवासी शेतकरी हनुमंत साधु गरदडे (वय ३३) यांना भरधाव टेम्पोने धडक देऊन गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी टेम्पो क्रमांक एमएच १६ सीडी ८०८९ वरील अज्ञात चालकाविरुद्ध शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ही घटना दिनांक १८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान शिरुर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनी पिकांची ई-पिक पाहणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची (मुंग, उडिद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे. ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC त दिवसाढवळ्या ऑफिसमधुन ९० हजार रुपयांची टूल्सबॅगची चोरी

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या ऑफिसमधून दिवसाढवळ्या तब्बल ९० हजार रुपयांची किमतीची टूल्सबॅग अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बबन नामदेव मिडगुले (वय ३७, रा. शिक्रापुर, वाबळेवाडी) यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी मिडगुले हे जागृती टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रोजेक्ट हेड […]

अधिक वाचा..

Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त श्री क्षेत्र अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर फुलांच्या बहरात नटले आहे. तब्बल पाच टन झेंडू, गुलाब, शेवंती व विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिर, महाद्वार व परिसराची सजावट करण्यात आली असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे डोळे दिपून जात आहेत. रविवार दि २४ ऑगस्ट पासुन सुरु असलेली द्वारयात्रा गुरवार दि २८ ऑगस्ट सकाळी १० […]

अधिक वाचा..

धारिवाल कुटुंबाकडून विठ्ठल मंदिर गणपतीला चांदीचा मुकुट अर्पण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मानाचा चौथा समजला जाणारा श्री विठ्ठल मंदिर गणपती उत्सव यंदा खास ठरला आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल व त्यांचे सुपुत्र आदित्य धारिवाल यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक पार पडली. या प्रसंगी धारिवाल कुटुंबाकडून पाच किलो वजनाचा भव्य चांदीचा मुकुट गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला. दानशूर वृत्ती, समाजाभिमुख कार्य व […]

अधिक वाचा..

शिरूरच्या बेट भागाने गमावले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व; ऍडव्होकेट वसुमती गावडे यांचे निधन 

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या पत्नी व कायदे तज्ञ वसुमती प्रभाकर गावडे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने बुधवार (दि. २७) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने टाकळी हाजी गावासह शिरूर तालुक्याच्या बेट भागात हळहळ व्यक्त होत आहे. वसुमती गावडे या अभ्यासू वकील म्हणून प्रसिद्ध होत्या. कायद्याबरोबरच कृषी, साहित्य, […]

अधिक वाचा..