त्या बड्या आधिकाऱ्याच्या दबावामुळे एका गुन्हयाचा तपास दोन पोलिस अधिकाऱ्यांकडून बदलला

शेतातून रस्ता न दिल्याच्या कारणावरून दहा जणांकडून तरुणास मारहाण प्रकरण.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतातून विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या कारणावरून सविंदणे (ता.शिरूर) येथे दहा जणांनी मिळून एका तरुणास लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता.२९ मार्च) घडली होती. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.परंतू या गुन्ह्याचा तपास संथ गतीने […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये कोयत्याच्या धाकाने मारहाण प्रकरणातील तिघांना अटक

शिरूर पोलिसांची तात्काळ आणि प्रभावी कारवाई शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विशाल कृषी सेवा केंद्रामध्ये घुसून कोयत्याच्या धाकाने केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. शिरूर पोलिसांची ही वेगवान आणि प्रभावी कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. (दि. ५) एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विशाल कृषी सेवा केंद्र, शिरूर […]

अधिक वाचा..
sharvin-palande

माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे नातू शर्विन पलांडे यांचे निधन…

शिक्रापूरः शिरूर तालुक्याची माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपूत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांचे अकस्मिक रविवारी (ता. १३) निधन झाले. मुखई येथे आज (सोमवार) अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शर्विन संजीव पलांडे यांचे बालपन आणि […]

अधिक वाचा..

बेट भागात यात्रा-जत्रांचे उत्सव सुरू, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या धार्मिक आणि सांस्कृतिक रंगांनी न्हालेला आहे. एप्रिल महिना आला की या भागातील गावोगावी पारंपरिक थाटामाटात यात्रा-जत्रांचे आयोजन केले जाते. गावकऱ्यांच्या उत्साहात आणि बाहेरगावी असलेल्या लोकांच्या मोठ्या उपस्थितीत या यात्रांचा उत्सव सर्वदूर दुमदुमत असतो. या यात्रांमध्ये देव जन्माचे कीर्तन, बैलगाडा शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा, कुस्त्यांचे जंगी आखाडे अशा विविध […]

अधिक वाचा..

शिरूरमधील सराईत गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कार्यवाही

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात सराफा दुकानावर फायरिंग करून तसेच गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या शरद बन्सी मल्लाव (वय २५, रा. काची आळी, शिरूर) या सराईत गुन्हेगाराविरोधात MPDA (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चालू वर्षातील पुणे ग्रामीण विभागातील पहिलीच धडक कार्यवाही ठरली आहे. शरद मल्लाव हा शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांबाबतच्या अवमानकारक वक्तव्यावरून शिवसेनेचा कृषिमंत्र्यांना इशारा; कोकाटेंना शिरूरमध्ये फिरू देणार नाही 

शिरूर (अरूणकुमार मोटे): “शेतकऱ्यांना कर्जमाफी साखरपुडा आणि लग्नासाठी हवी असते” असे विधान करून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून, या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या कोकाटे यांना शिरूर तालुक्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तालुकाप्रमुख पोपट शेलार […]

अधिक वाचा..
psi-sagar-dhumal-pimple

शिरूर तालुक्याचे सुपुत्र Psi सागर धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलातील Psi सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सागर धुमाळ यांनी २०१८ मध्ये परिस्थितीशी झगडत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सागर यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने […]

अधिक वाचा..

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सविंदणे जिल्हा परिषद शाळेचे अभूतपूर्व यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश मिळवत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता दुसरी मधील कृष्णा रामचंद्र देशमुख याने १४४ गुण मिळवत संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शिवण्या अजित पडवळ याने १३८ गुण मिळवत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेजाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस पेटून ५० हजार रुपयांचे नुकसान

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्रीने दहशत; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्री घेऊन तिघांनी दहशत माजवत एका व्यक्तीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “आमच्याविरोधात तहसील कार्यालयात तक्रार करतोस का?” असे म्हणत तिघांनी एकावर हल्ला केला असून, याप्रकरणी तिघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात संतोष बाळू पाचर्णे (वय ४२) व्यवसाय […]

अधिक वाचा..