शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

क्राईम

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. टेलरच्या दुकानात घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे या संपूर्ण कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त केले आहे.

शुभम विलास अंबुरे (वय २६, रा. शिक्रापूर रस्ता, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मूळचा बीड जिल्ह्यातील असलेला शुभम गेल्या तीन महिन्यांपासून शिक्रापूर येथील एका सलूनमध्ये काम करत होता. त्याने हवाई दलात कार्यरत असलेले आणि सन २०२२ मध्ये निधन झालेले मयत जवान रजतकुमार मिश्रा यांच्या नावाने एक हुबेहूब बनावट ओळखपत्र तयार केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शुभम अंबुरे हा बनावट ओळखपत्र घेऊन बालाजी टेलर्समध्ये गेला आणि त्याने हवाई दलाचा गणवेश शिवण्याची ऑर्डर दिली. टेलर गणवेशाचे माप आणि ओळखपत्राची पडताळणी करत होते. त्याचवेळी दुकानात हवाई दलाचे खरे जवान ब्रिजेशकुमार मिश्रा आले. टेलरने शुभमने दिलेले ओळखपत्र जवान ब्रिजेशकुमार यांना दाखवले. ओळखपत्र पाहून अधिक पडताळणी केली असता ब्रिजेशकुमार चक्रावले. कारण ज्या रजतकुमार मिश्रा यांच्या नावाचे ते ओळखपत्र होते, त्यांचा २०२२ मध्येच मृत्यू झालेला होता. क्षणाचाही विलंब न लावता ब्रिजेशकुमार यांनी अधिक चौकशी केली असता समोरचा व्यक्ती तोतया असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तात्काळ लोहगाव पोलिसांना पाचारण केले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी शुभम अंबुरेला बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जुलै रोजी लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीतील ‘बालाजी टेलर्स’ या दुकानात हा संपूर्ण प्रकार घडला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.

शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

शिक्रापूरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, पॉवर बँकांसह १७,६०० रुपयांचा ऐवज लंपास

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत