psi-sagar-dhumal-pimple

शिरूर तालुक्याचे सुपुत्र Psi सागर धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलातील Psi सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

सागर धुमाळ यांनी २०१८ मध्ये परिस्थितीशी झगडत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सागर यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने सागर हे त्यांच्या कुटुंबाचा आधार होते. २०२३ मध्ये नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांना किडनीचा आजार जडल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असताना सागर यांच्या आईने आपल्या मुलासाठी किडनी देण्याचा निर्णय घेतला. किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया देखील सुरु होती. मात्र, सागर धुमाळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच (ता. ७) त्यांचा मृत्यू झाला. सागर धुमाळ यांच्या मागे आई-वडील, पत्नी, पाच वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. एक होतकरू पोलिस अधिकारी आणि कुटुंबाचा आधार गेल्याने शिरुर तालुक्यासह पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सागर यांचा मनमिळावू व शांत स्वभाव होता. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच नवी मुंबईपासून पिंपळे खालसापर्यंत शोककळा पसरली. दरम्यान, अनेकांनी सोशल मीडियावर सागर यांच्या आठवणी, फोटो व श्रद्धांजली संदेश शेअर केले. पिंपळे खालसा येथे मंगळवारी (ता. ८) सकाळी सागर धुमाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. पोलिसांचा मानद गार्ड ऑफ ऑनर, वाजतगाजत अंत्ययात्रा आणि साश्रुनयनांनी डोळे यामुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाला होते.

पिंपळे धुमाळ येथील स्वातंत्र्य सैनिकाला कुटुंबियांनी दिले वाढदिवसाचे सरप्राईज!

पिंपळे खालसा शिष्यवृत्ती पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

पिंपळे खालसात स्वातंत्र्य सेनान्याचे जल्लोषात अभीष्टचिंतन

पिंपळे खालसा येथील डावखरे विद्यालयातील तब्बल 57 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

पिंपळे खालसा येथील बचट गटातील महिलांना प्रशिक्षण!