गोकुळच्या निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस; मुश्रीफ-महाडिक गटाचा संघर्ष टोकाला

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध संस्थांच्या पात्र-अपात्रतेच्या मुद्द्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. न्यायालयीन आदेशानंतर अवसायानातील संस्थांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत हालचाली सुरू असतानाच ऐनवेळी संबंधित अधिकाऱ्याची […]

अधिक वाचा..

गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन आणि रोजगाराच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. उद्योगांचे गाजर दाखवून नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीची लूट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा अपुरी असून डॉक्टर, परिचारिका आणि […]

अधिक वाचा..

शिक्षक भरतीचा मोठा टप्पा पूर्ण; १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस

मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच खासगी व्यवस्थापनाच्या […]

अधिक वाचा..

‘मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करा’; हिंदी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांना एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी […]

अधिक वाचा..

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्यांकडून सासरच्या छळाचा गंभीर आरोप

पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप माहेरच्यांनी केला आहे. शिल्पा यांचा विवाह वाकड परिसरातील गवारे कुटुंबात झाला होता. […]

अधिक वाचा..

विशेष अधिवेशनाच्या चर्चेने दिल्लीचे राजकारण तापले; राष्ट्रपतींच्या आदेशाची प्रतीक्षा, सरकारच्या हालचालींवर विरोधकांची नजर

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित होऊन १४ दिवस उलटले असतानाही अधिवेशनाच्या सत्रावसानाबाबत राष्ट्रपतींकडून अद्याप अधिकृत आदेश जारी झालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी यापूर्वीच याबाबत सूचक विधान केले होते. त्यातच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू […]

अधिक वाचा..

भाजपचे ज्येष्ठ नेते बालगोविंद प्रसाद यादव यांचे निधन; शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार

कोडरमा : भाजपचे ज्येष्ठ नेते बालगोविंद प्रसाद यादव यांचे मंगळवारी पोखरवाडी येथील पैतृक निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बुधवारी पोखरवाडी येथील सकरी नदीकाठच्या मुक्तिधामात त्यांच्या पार्थिवावर शासकीय आणि सामाजिक सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम यात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप जोशी, […]

अधिक वाचा..

एमपीएससीच्या कारभारावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाचा आरोप

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपरफुटीचे प्रकरण केवळ गैरप्रकारापुरते मर्यादित नसून त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. एमपीएससीच्या वर्ग-१ आणि वर्ग-२च्या अनेक पदांवर सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आयोगाची कार्यपद्धती स्वच्छ करण्याची […]

अधिक वाचा..

पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन; सुनेत्रा पवारांकडून मदतीची ग्वाही

पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश घटनेच्या दिवशीच पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली असून, पीडितेच्या भावंडांच्या […]

अधिक वाचा..

वाहन मालकी हस्तांतरणासाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य; देशभरात एकसमान ऑनलाइन प्रक्रिया

नवी दिल्ली : वाहन मालकी हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी देशभरात आता एकसमान आणि प्रमाणित ऑनलाइन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑनलाइन वाहतूक सेवांची एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मालकी हस्तांतरण आणि […]

अधिक वाचा..