इंदुरीकर महाराजांचे परखड वक्तव्य; तरुणांना ‘यूज अँड थ्रो’पासून सावध राहण्याचं आवाहन

अकोला: अकोल्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत कीर्तन करत समाजातील विविध प्रश्नांवर परखड भाष्य केलं. तरुणाई, शिक्षण व्यवस्था, दंगली, प्रेमप्रकरणं आणि सामाजिक वास्तव यावर त्यांनी थेट शब्दांत मत मांडलं. तरुणांना उद्देशून बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका. तुमचा वापर फक्त ‘यूज अँड […]

अधिक वाचा..

व्हॉट्सअॅपच्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा; ‘संविधान पाळू शकत नसाल तर भारत सोडा’

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांच्या २०२१ च्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दांत ताशेरे ओढले. या धोरणामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर गदा येत असल्याचा गंभीर मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना व्हॉट्सअॅपचे गोपनीयता धोरण “शोषणकारी” असल्याचा आरोप केला. केवळ वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणेच […]

अधिक वाचा..

अपंगत्व नसताना दिव्यांग लाभ; गुन्हा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत राज्यातील पहिली कारवाई

सांगली: लाक्षणिक अपंगत्व नसतानाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेतील लाभ घेतल्याप्रकरणी ईश्वरपूर (जि. सांगली) येथील निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रघुनाथ राजराम भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा ठरला आहे. शासकीय, निमशासकीय सेवा तसेच विविध योजना व सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व […]

अधिक वाचा..

डोक्यात बसलाय, आज कायमचा बंदोबस्त करतो म्हणत तरुणाची निर्घृण हत्या

लातूर: “लय दिवसांपासून तू माझ्या डोक्यात बसला आहेस, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो,” असे म्हणत दोन मित्रांनी एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.प्रज्वल ऊर्फ गोट्या संजय मस्के (वय २१) असे हत्या […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना दिला खडे बोल, एमसीए सदस्यसंख्या वाढवण्याबाबत तीव्र नाराजी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाने तीव्र खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मधील सदस्यसंख्या वाढवण्याच्या बेकायदेशीर प्रयत्नांबाबत न्यायालयाने गंभीर नाराजी व्यक्त केली. केदार जाधव यांच्या याचिकेनुसार, रोहित पवारांनी MCAची सदस्यसंख्या 154 वरून 571 वर नेली, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि इतर राजकीय व शैक्षणिक व्यक्तींचा समावेश होता. या […]

अधिक वाचा..

MD च्या स्वप्नाला ब्रेक! MBBS झालेल्या डॉक्टरची आत्महत्या

नागपूर: शहरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. बुलढाणा (चिखली) येथील रहिवासी ऋत्विकने मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. वडील डॉ. सागर ठाकूर व आई दोघेही डॉक्टर असून, बहीण देखील […]

अधिक वाचा..

बाबा वेंगांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी चर्चेत; सोनं-चांदी ठरणार सुरक्षित गुंतवणूक

जगभरात संभाव्य आर्थिक संकटाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली असून यामागे प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या भाकितांचा उल्लेख होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पैशांची टंचाई निर्माण होणार असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संकटाच्या काळात सोनं, चांदी आणि तांबं या धातू सुरक्षित गुंतवणूक ठरतील, असं बाबा वेंगांनी भाकीत केलं […]

अधिक वाचा..

अमरावती महापालिकेत भाजपचा डावपेच! राष्ट्रवादीला सोबत घेऊन राणा दाम्पत्याला थेट संदेश

अमरावती: महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने संख्याबळ जुळवताना युवा स्वाभिमानला सोबत घेतले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)लाही युतीत सहभागी करून घेत राजकीय चेकमेट खेळी खेळली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसोबत राहून विरोधात काम केल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी ‘महापौर भाजपचाच’ असा प्रचार निवडणुकीनंतर राबविणाऱ्या युवा स्वाभिमानला भाजपने त्यांच्या शैलीतच उत्तर दिले आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत […]

अधिक वाचा..

३० आमदारांची सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमण्याची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. पक्षातील तब्बल ३० आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी विनंती करणारे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे. अजितदादा पवार यांच्या […]

अधिक वाचा..

गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित! धनदांडग्यांना लाभ नाही; चंद्रशेखर बावनकुळे

धाराशिव: राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे शेतात राबूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले […]

अधिक वाचा..