सांगलीत ६५ वे राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यास मान्यता; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागात स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते.विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन यावर्षी प्रदर्शन सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची १८००२२१२५१ हि’ हेल्पलाईन सुरू

मुंबई: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित

पाणीपुरवठा, रस्ते, सुविधा आणि महिलांसाठी योजनांना प्राधान्य देणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा वाशीम: ज्या वेळी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहतात त्या वेळी शिवसेनेचा विजय निश्चित असतो. वाशिम-मालेगाव नगरपंचायतीसह कारंजा नगरपरिषदेचा नवीन विकासाचा अध्याय आता लिहिला जाणार आहे. विकासाचे राजकारण नव्हे तर विकासाचे समाजकारण करायचे असून आता थेट अॅक्शन मोडवर काम होईल, असे […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

राज्यातलं माझं वजन कमी झालंय: दिलीप वळसे पाटील

शिरूर : यंदा काय झाले मलाही समजायला मार्ग नाही पण राज्यातले माझे वजन कमी झाले आहे, अशी खंत राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगाव-शिरूरचे आमदार दिलीप वळसे पाटील त्यांनी बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील अल्पमतांनी विजयी झाले आहेत. यामुळे निवडणूक निकालाची बोच त्यांना लागून राहिलेली आहे. मतदारसंघातील जनतेवर ते अजूनही नाराज असल्याचे दिसून […]

अधिक वाचा..

शाखा तिथे संविधान ह्या शिवसेना अभियानाची मुंबईतुन सुरुवात….

मुंबई: शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून “*शाखा तिथे संविधान*” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षिततेसाठी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ धोरणाचा प्रस्ताव; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र चौकशीसह महिला सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना […]

अधिक वाचा..

…तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायच

मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे. मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं. […]

अधिक वाचा..

तिजोरीची चावी आमच्याकडेच, चाव्या नसल्या तरीही मालक आम्हीच सत्ताधाऱ्यांची ही वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे

निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..

सरकारी नोकरी संधी! केंद्रीय व नवोदय विद्यालयांत तब्बल 14967 पदांची महाभरती

औरंगाबाद: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही जबरदस्त खुशखबर आहे. देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांनी KVS NVS Bharti 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने गोल्डन चान्स आहे एकूण 14967 पदे  स्थिर सरकारी नोकरी उच्च वेतनश्रेणी देशभरात पोस्टिंगची संधी नोकरीसह प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य रिक्त जागांची […]

अधिक वाचा..

वंदना गुप्ते यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…

मुंबई: मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा आणि त्या निमित्ताने रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी ‘जागतिक रंगकर्मी […]

अधिक वाचा..