‘छात्रों की गुंज’ला भाजपाचा विरोध; कन्हैयाकुमारांचा घणाघात

“राहुल गांधी अमित शाहांसमोर झुकले नाहीत, फडणवीसांसमोर कशाला झुकतील?” पुणे : मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या पुण्यात उद्या, २२ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाला राहुल गांधींच्या ‘छात्रों […]

अधिक वाचा..

‘माती जपा, पाणी वाचवा’; राज्यभर ‘महा वॉकेथॉन’चा जलसंधारणाचा जागर

मुंबई : ‘माती जपा, पाणी वाचवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशाने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या **‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’**ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जलसंधारण दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांमधून दोन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले. मुंबईतील वरळी येथील सागरी […]

अधिक वाचा..

केरळमध्ये शिवसेनेचा विस्तार; ‘८० टक्के सामाजिक सेवा, २० टक्के राजकीय काम’ मॉडेलवर भर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये संघटनात्मक विस्ताराला वेग देताना शिवसेनेने सामाजिक सेवेला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘८० टक्के सामाजिक सेवा आणि २० टक्के राजकीय काम’ या मॉडेलच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क वाढविण्यावर पक्षाचा भर असल्याचे शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शाइना एनसी यांनी सांगितले. तिरुवनंतपुरम प्रेस क्लबमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केरळमधील पक्षाच्या […]

अधिक वाचा..

मोदींच्या कारभारामुळे देशात सत्ताबदल होणार; २०२९ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : आगामी काळात देशात सत्ताबदल होणार असून, हा बदल काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षामुळे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांतील कारभारामुळे होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०२९ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वबदलाची तयारी सुरू […]

अधिक वाचा..

बीडच्या राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पॉक्सो गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीड येथील राष्ट्रीय पातळीवरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. अटकेची भीती आणि जामिनाबाबत निर्माण झालेल्या तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीत भाजपचे स्लीपर सेल? सच्चिदानंद सिंहांच्या नोटिशीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला पक्षांतर्गत वाद आता नव्या राजकीय आरोपांमुळे चांगलाच तापण्याची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या रिमाइंडर नोटिशीवरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर राजकीय संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपचे काही ‘हस्तक’ किंवा ‘स्लीपर सेल’ कार्यरत असल्याचा दावा […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी आता स्वस्तात एसटी आरक्षित करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला आहे. आता संपूर्ण एसटी बस आरक्षित ( ग्रुप बुकिंग) करण्यासाठी पूर्वी आकारण्यात येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे गणेश भक्तांना स्वस्तात एसटी बसने प्रवास करता येईल. या निर्णयाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. गणेशोत्सव […]

अधिक वाचा..

टाटा कार खरेदीचा विचार करताय? १ सप्टेंबरपासून गाड्या महागणार; २५ हजारांपर्यंत वाढ

मुंबई : टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ही दरवाढ येत्या १ सप्टेंबर २०२६पासून लागू होणार असून, विविध मॉडेल्सच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाढता उत्पादन खर्च आणि महागाईचा सातत्याने असलेला दबाव यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात […]

अधिक वाचा..

जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धे’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाची दखल घेत रील्स स्पर्धेसाठी रील्स अपलोड करण्याची अंतिम मुदत […]

अधिक वाचा..

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा; TISS अहवालानंतर दोन महिन्यांत निर्णय

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू आणि कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नुकसानभरपाईचे निकष निश्चित करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मार्फत सविस्तर अभ्यास सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांत मच्छीमारांना भरीव नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..