इयत्ता ११ वी प्रवेशाची विशेष फेरी जाहीर; २५ ऑगस्टला प्रवेश वाटप

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अंतिम संधी असून विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे. संचालनालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत १५,५२,६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १३,४३,४१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश […]

अधिक वाचा..

खासगी शिकवणी केंद्रांवर आता कायद्याचा लगाम; शासनाकडून प्रारूप मसुदा जाहीर

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी आणि नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने पाऊल टाकले आहे. ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ या प्रस्तावित कायद्याचा प्रारूप मसुदा शासनाने तयार केला असून, त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप; पार्थ पवारांच्या शरद पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य असल्याचा आक्षेप पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे. सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यानुसार, २६ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द; ठाकरे गटाला धक्का, न्यायालयीन लढाईचा इशारा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द झालेले नाही. संबंधित विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नसल्याने पुढील निर्णय […]

अधिक वाचा..

मोदींच्या राजकीय भवितव्यावर राहुल गांधींचा दावा; राऊत म्हणाले, ‘१७ सप्टेंबरनंतर उलगडा होईल’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याचा दावा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..

दिव्यांग-ज्येष्ठांसाठी केंद्राची विशेष मोहीम; १०० हून अधिक जिल्ह्यांत महाशिबिरांतून मोफत सहायक उपकरणांचे वाटप

नवी दिल्ली : देशातील दिव्यांग व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने विशेष मोहीम सुरू केली आहे. देशभरातील १०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये ‘महाशिबिरां’चे आयोजन करण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांना विविध प्रकारची सहायक उपकरणे आणि साधने मोफत दिली जात आहेत. ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ आणि ‘एडीआयपी’ […]

अधिक वाचा..

शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; e-KYC साठी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ

पुणे : राज्यभरातील खाजगी शाळांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे e-KYC पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२६ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार; CSR निधीसाठी प्रकल्प बँक तयार करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कॉर्पोरेट सामाजिक दायित्व अर्थात CSR निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नियोजनबद्ध वापर करण्यासाठी राज्यात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत या प्राधिकरणाच्या स्थापनेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यात CSR अंतर्गत विविध उपक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर राबविले […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र-हेसनमध्ये उद्योग, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र आणि जर्मनीतील हेसन राज्य यांच्यात उद्योग, सेवा, माहिती-तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसन राज्याचे अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीमुळे महाराष्ट्रासाठी हेसन हे जर्मनी आणि युरोपचे, तर हेसनसाठी महाराष्ट्र हे […]

अधिक वाचा..