ओपन विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! फीमध्ये 50% ते 100% सवलत; जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र

मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत खुल्या (Open) तसेच एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना उत्पन्न आणि अभ्यासक्रमानुसार 50 ते 100 टक्क्यांपर्यंत फी सवलतीचा लाभ मिळू शकतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील पहिल्या दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळतो. तसेच हा लाभ केवळ पूर्णवेळ (Full-time) अभ्यासक्रमांसाठी लागू असून विद्यार्थी इतर कोणत्याही शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घेत नसावा.

फी सवलतीचे स्वरूप

वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत: शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमध्ये 100% फी माफी, तर विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये 50% फी सवलत.

₹2.5 लाख ते ₹8 लाख उत्पन्न (व्यावसायिक अभ्यासक्रम): 50% पर्यंत फी सवलत.

₹8 लाखांपर्यंत उत्पन्न (बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रम): 100% फी माफी.

आवश्यक कागदपत्रे

अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास CAP राउंडची कागदपत्रे, गॅप सर्टिफिकेट आणि दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र सादर करावे लागते.

अर्ज प्रक्रिया

पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत MahaDBT पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज अंतिम स्वरूपात सादर करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत