एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या […]

अधिक वाचा..

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?

मुंबई: भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याच्या प्रसंगावधनामुळे फसला तरुणीवरील बलात्काराचा प्रसंग

पोलिसांच्या सतर्कतेने पिडीत तरुणी नातेवाईकांच्या स्वाधीन पुणे: उरुळीकांचन येथील शेतकऱ्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे नराधमाच्या तावडीत सापडलेल्या एका परप्रांतीय तरुणीची सुटका झाली आहे. तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न फसला असून ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) रेल्वे स्थानक परिसरातील तांबे वस्ती परिसरात सोमवारी (दि. 4) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धनंजय मारुती तांबे (रा. तांबेवस्ती, […]

अधिक वाचा..

आता या लाभार्थ्यांचे रेशन धान्य होणार बंद

मुंबई: चारचाकी वाहन असणारे, आयकर भरणाऱ्यांसह वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रेशनकार्डधारक लाभार्थीची जिल्हा पुरवठा विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे. राज्य सरकारकडून रेशन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. गरज नसताना मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य […]

अधिक वाचा..

प्रेमप्रकरणातून दिवसाढवळ्या आरोपीने तरुणावर चाकूने केले सपासप वार

बुलढाणा: बुलढाणा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे 1 ऑगस्ट रोजी घडली आहे. मृत्यू झालेल्या निष्पाप तरुणाचे सीन सुरेश जाधव (वय 19) असे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठीजे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. मुंबईत […]

अधिक वाचा..

राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे ७ व ८ ऑगस्टला टिळक भवनमध्ये निवासी शिबीर

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२५ रोजी पक्षाचे दादर येथील मुख्यालय टिळक भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे शिबीर आयोजित केले आहे. हे दोन दिवसीय निवासी शिबीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्ष […]

अधिक वाचा..

निवडणुकीच बिगुल वाजल! महाराष्ट्रात OBC आरक्षणासह निवडणुका होणार

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022 च्या पूर्वीच्या वॉर्ड […]

अधिक वाचा..

आई-वडिलांनी मोबाईल घेण्यास नकार दिल्याने 16 वर्षीय मुलाने संपवले जीवन

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पालकांसमोर एक मोठे आव्हान बनत चालले आहे. नेमक प्रकरण काय मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. हा […]

अधिक वाचा..