आई-वडिलांनी मोबाईल घेण्यास नकार दिल्याने 16 वर्षीय मुलाने संपवले जीवन

महाराष्ट्र

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पालकांसमोर एक मोठे आव्हान बनत चालले आहे.

नेमक प्रकरण काय

मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. हा मुलगा शिक्षणासोबत पोलीस भरतीची देखील तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आईनेने मोबाईल घेण्यास स्पष्ट नकार दिला.

आईच्या नकाराने तो नाराज झाला होता. या नकाराने तो थेट खवडया डोंगरकडे गेला आणि उंचावरून उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलीस या घटनेचा पुढील तपस करत आहेत. मात्र, या घटनेने आता सर्व पालकांसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.