फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; म्हणाले…

मुंबई: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली. भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या […]

अधिक वाचा..

पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर कडक कारवाई करा

मुंबई: गेली तीन-चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ॲप आधारित संस्था प्रवाशांकडून आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून अशा आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थावर कडक कारवाई करावी. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला (RTO) दिले आहेत. त्यानुसार गेली दोन […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही […]

अधिक वाचा..

अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरात कडाडले

तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा; मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुका एकवाटला संगमनेर: राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी […]

अधिक वाचा..

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव अन् राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीस…

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली […]

अधिक वाचा..

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या […]

अधिक वाचा..

वाहनधारकांनो सावधान! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अर्ध्या किमी. दुरून सुद्धा पकडणार; RTO ची नवीन यंत्रणा सज्ज

संभाजीनगर: आरटीओ कार्यालयांची इंटरसेप्टर वाहने अधिक सक्षम होणार आहेत कारण त्यांच्यावर रडार प्रणाली बसवली जात आहे. रडार प्रणाली म्हणजे काय रडार म्हणजे अशी प्रणाली जी वाहनाचा वेग, हालचाल आणि नियमभंग दूरूनच ओळखते. यात हाय-टेक कॅमेरे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर वापरले जातात. त्यामुळे वाहन थांबवण्याची आवश्यकता नसते. रडार प्रणाली कशी काम करेल 1) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा […]

अधिक वाचा..

३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार…

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत आज महत्त्वाची विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू आणि काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी बुधवारी संसदेत तीन विधेयके मांडली जाणार असल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

बेस्टच्या निवडणुकीत पराभव का झाला? ठाकरे गटाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई: मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. पण या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँडचा पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

अधिक वाचा..