भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख…

पटणा: जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे,सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे हे, आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना घेराव

मुंबई: महाराष्ट्रातील तरुणाईच्या भविष्याशी खेळ करण्याचे महायुती सरकारचे धोरण उघड झाले आहे. राज्यसेवा 2022 परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असला तरी, अद्याप 623 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या भविष्यावर घोर अन्याय होत आहे. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता पूर्णतः हरवली असून, […]

अधिक वाचा..

पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे अजित पवरांनी केले कौतुक 

मुंबई: नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि […]

अधिक वाचा..

क्रिडाई ने एसटीची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे…

मुंबई: राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्याचे आम्ही शहरी, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही

शिर्डी: महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

शेतावरचा रस्ता रोखणाऱ्यांची ‘वाट’ लागली, वहीवाटीत वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार….

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतावरील वहीवाटीचा रस्ता काही कारणास्तव अडवला गेलेला आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे, तर ज्यांनी शेतीवरच्या वाटा रोखून धरल्या आहेत, अशांना मोठा दणका मिळणार आहे. कारण वहीवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावा लागणार आहे. रस्ता तयार करण्यासंबंधीचा निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी ‘गाइडलाइन्स’ प्रसिद्ध करण्याच्या सूचना सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत. […]

अधिक वाचा..

मुलांच्या मोफत शिक्षणासाठी RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात; असा करा ऑनलाइन अर्ज

मुंबई: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. अर्जासाठी पात्र शाळा: स्वयंअर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळा पोलिस कल्याणकारी शाळा महानगरपालिका (स्वयंअर्थसहाय्यित) शाळा ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे […]

अधिक वाचा..

मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे

शिर्डी: मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील […]

अधिक वाचा..

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; जाणून घ्या नोंदणी करण्याची प्रक्रिया

20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू मुंबई: बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. उद्या म्हणजेच 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची […]

अधिक वाचा..

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! SSC बोर्डाकडून हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रवेशपत्र (हॉल तिकीट) कधी उपलब्ध होणार याची तारीख जाहीर केली आहे. प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख सोमवार, 20 जानेवारी 2025 पासून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ऑनलाइन डाऊनलोड करता येईल. कुठे मिळेल हॉल तिकीट महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.mahahsscboard.in” Admit Card” या लिंकवर क्लिक करून […]

अधिक वाचा..