समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी संकटाच्या छायेत; धनंजय मुंडे

मुंबई: बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही खरीप हंगामातील पेरणीच्यादृष्टीने समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला असताना मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी जाहीर भूमिका राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. त्यांच्या या जाहीर भूमिकेचे स्वागत केले जात आहे. (दि. १५) जुलै रोजी धनंजय मुंडे […]

अधिक वाचा..

शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील

मुंबई: क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी; दीपक केसरकर

मुंबई: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य प्रसिद्ध शेफ विष्णू […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा; नाना पटोले

मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा

मुंबई: राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधानभवनात काल गुरुवार (दि. 13) रोजी सायंकाळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..
amravati child

महाराष्ट्रात महिलेने दिला एकाच वेळी चार मुलींना जन्म…

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील एका महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला असून, चारही बाळं आणि माता सुखरुप आहे. चारही बाळ मुली आहेत. बाळांचे वजन कमी असल्याने सध्या त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे. पपिता बळवंत उईके (वय 24, रा. दुनी, जि. अमरावती) या महिलेला बुधवारी (ता. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास […]

अधिक वाचा..

झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती गठित

मुंबई: रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे […]

अधिक वाचा..

महिलांसाठी सार्वजनिक सुविधा केंद्र सुरू करणार; पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई: राज्यात नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शासन काम करीत आहे. याच उद्देशाने मुंबई शहरात देखील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘एफ दक्षिण’ विभागातील महिलांसाठी सुविधा केंद्र उभारून तेथे त्यांना आठवड्यातून […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम

मुंबई: पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्तराष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत […]

अधिक वाचा..