छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 87 शाळा बोगस….

औरंगाबाद: नुकतेच राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आली, आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील तब्बल 87 खासगी इंग्रजी शाळा बोगस असल्याचे समोर आले असून शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या बोगस शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात शाळांच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही

मुंबई: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. पंचनामे ताबडतोब करणे व तात्काळ मदत करणे अशी भूमिका राज्यसरकारची दिसत नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज राष्ट्रवादी भवन येथे बैठकीला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला […]

अधिक वाचा..

शेतकरी म्हणाला, आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. २५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. शनिवारी रात्री […]

अधिक वाचा..

रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो…

अयोध्या: रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक अशा राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो असल्याची प्रतिक्रिया महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अयोध्येतून व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येत जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले आणि महाआरतीत देखील सहभाग घेतला. मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार

नवी दिल्ली: प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु रामच्रंद्राच्या जन्मस्थळी दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करताना सायबर सुरक्षेबद्दल सजगता आवश्यक…

मुंबई: एकीकडे भारताची वाटचाल डिजिटल इंडियाकडे होत असताना देशातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण वाढत आहे. लहान मुले, महिला तसेच सामाजिक व आर्थिक संस्था देखील सायबर गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. अश्यावेळी विद्यार्थी, युवा पिढी तसेच पालकांनी सायबर गुन्ह्यांबाबत सजग व जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे सायबर विश्व सुरक्षित ठेवणे केवळ पोलिसांचीच नव्हे, तर पालक, शिक्षक व […]

अधिक वाचा..

नेते आवरा हो स्वतःला!…जनतेसाठी काम करा, स्त्री सन्मानाच्या चिंधड्या होत आहेत…

मुंबई: आपल्या देशात कधी झाला नाही इतका मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांचा उपयोग वर्तमानात होताना दिसतो .२०१४ पासून या समाज माध्यमांचा उपयोग  आपल्या विरोधी पक्षाना नामोहरम करण्यासाठी करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले. समाज माध्यमातून आपली स्वतःची आयटी सेल, ट्रोलर तयार केले. त्यानंतर मग सगळेच राजकीय पक्ष समाज माध्यमातून आपली ही लढाऊ सैन्य तयार करू लागले […]

अधिक वाचा..

बळीराजा अडचणीत असताना शिंदे सरकारला मात्र शेतकऱ्यांचा विसर

मुंबई: राज्यातला बळीराजा अडचणीत असताना विद्यमान शिंदे सरकारला आपल्या संविधानिक कर्तव्याचा विसर पडला आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये द्राक्ष, काजू, संत्रा, केळी अशा फळांचा समावेश आहे. शेतकर्‍यांच्या […]

अधिक वाचा..

ऍड. गुलाबराव घोरपडेंच्या निधनाने काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ता गमावला…

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गुलाबराव घोरपडे यांचे निधन अत्यंत धक्कादायक व मनाला वेदना देणारी घटना आहे. घोरपडे हे काँग्रेस विचारांचे पाईक होते, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. घोरपडे यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. अॅड. […]

अधिक वाचा..

शरद पवारांचे मत काहीही असो, अदानी घोटाळ्याची चौकशी जेपीसीकडूनच व्हावी…

मुंबई: अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? हे जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे. राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असून काँग्रेस पक्षासह देशातील विविध राजकीय पक्षांनी अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून व्हावी अशी मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

अधिक वाचा..