मुंबई मराठीग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा स्नेहसंमेलन

मुंबई: शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगांव शाखेचे ७२ वे वार्षिक स्नेहसंमेलन (दि. ३०) मार्च २०२३ रोजी उत्साहात पार पडले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे सुधींद्र कुलकर्णी व […]

अधिक वाचा..

सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत केले अनोखे आंदोलन…!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील घटना… औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी आज पंचायत समिती कार्यालया फुलंब्रीसमोर तब्बल दोन लाख रुपयांची उधळण करीत शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला असून पंचायत समितीमध्ये दाखल विहिरीचा प्रस्ताव मंजूर करताना 12 टक्के रक्कम मागितली जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला. पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर शहरातील एकाचा मृत्यू, ७ जण जेरबंद…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथील राम मंदिरासमोरील राड्यात जखमी झालेल्या एकाचा काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला असून या राड्या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून शेख मुनिरुद्दिन मोईनुद्दीन (वय 54, रा. किराडपुरा) असे मृताचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्यांची नाव खालीलप्रमाणे सय्यद नूर सय्यद युसुफ (वय 27), धंदा – मजुरी […]

अधिक वाचा..

तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवा आम्ही या भागाचा विकास करुन दाखवू…

गोंदवले: श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात याआधीच पर्यटन विभाग आणि संबंधित मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. ग्रामस्थांनी याभागाच्या विकासाकरिता सविस्तर कृती आराखडा तयार करून तो सादर करावा. याभागाच्या विकासासाठी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांच्यावरती जनतेने विश्वास दाखवला तर तो आम्ही सार्थ करून दाखवू, असे मत उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने कात्री लावण्याचे केले पाप…

मुंबई: विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या […]

अधिक वाचा..

शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी… मुंबई: हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट […]

अधिक वाचा..

पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार; दिपक केसरकर मुंबई: केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय […]

अधिक वाचा..

राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा…

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला […]

अधिक वाचा..

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल…

अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले. कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात राम मंदिराबाहेर दोन गटात तुफान राडा

पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ… औरंगाबाद: सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, छत्रपती संभाजीनगरातील किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली. किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना […]

अधिक वाचा..