छत्रपती संभाजीनगरात राम मंदिराबाहेर दोन गटात तुफान राडा

क्राईम महाराष्ट्र

पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ…

औरंगाबाद: सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, छत्रपती संभाजीनगरातील किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली. किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.

रस्त्यावर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन सगळ्यांना आवाहन केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

इम्तियाज जलील अतुल सावे प्रदीप जयस्वाल आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: मंदिरात कोणतीही हानी नाही अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.