राज्यपाल कोश्यारी देणार राजीनामा; मोदींना दिलेल्या पत्रात ‘हे’ सांगितलं कारण…

औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती. अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असून आता आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

१० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार… औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत मोठा बदल केला असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख […]

अधिक वाचा..

भारतीय जुमला पार्टीचे प्रत्येक पाप जनतेपर्यंत पोहचवा; नाना पटोले

पुणे: देश स्वतंत्र झाला तेव्हा जाताना इंग्रजांनी देश लुटला होता पण काँग्रेसने ७० वर्षात हा देश उभा केला. मागील ८ वर्षांपासून भाजपाचे सरकार केंद्रात असून त्यांनी ७० वर्षात उभे केलेले सर्व वैभव रसातळाला मिळवले. २०१४ साली सत्तेत येताना जनतेला भरमसाठ आश्वासने दिले पण सत्तेत येताच त्यांना त्याचा विसर पडला आणि ती तर निवडणुकीतील जुमले होते […]

अधिक वाचा..

शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही; जयंत पाटील

मुंबई: शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही, त्यांची देणी तातडीने द्या…

मुंबई: मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या 6 महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल […]

अधिक वाचा..

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून शिंदे सरकारची ही […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

मुंबई: राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन […]

अधिक वाचा..

शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षालाच दोष दिला…

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करताना विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षाचे सरकार मुंबईचा विकास होऊ देत नव्हते, भ्रष्टाचार होत होता असा आरोप मोदींनी केला. परंतु मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षच सत्तेत सहभागी होता हे मोदींना माहित नाही का? शिवसेनेने विकास केला नाही किंवा भ्रष्टाचार केला असेल […]

अधिक वाचा..

एम.फील. अर्हता धारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू; चंद्रकांत पाटील

मुंबई: एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले होते. या निवेदनावर आज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे चर्चा झाली. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) च्या (दि. 5) सप्टेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार, अध्यापकांना कॅस चे लाभ देण्याबाबत […]

अधिक वाचा..