पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील गुरुनानक स्वीट मार्टमधून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळी शोरूममध्ये […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच हे खासदार लोकसभा अध्यक्ष Om Birla यांची भेट घेऊन […]

अधिक वाचा..

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे. प्रियकर सक्षम ताटेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या आंचल मामीडवारने आता ते घर सोडल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. काही महिन्यांपूर्वी आंचल मामीडवारच्या प्रियकराचा, सक्षम ताटेचा, तिच्याच वडिलांनी आणि भावाने कथितरित्या खून केल्याची घटना समोर आली होती. […]

अधिक वाचा..

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. दोन तृतीयांश फुटीसाठी आवश्यक असलेला सहा खासदारांचा आकडा पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूमिका बदलल्याने ठाकरे गटाला […]

अधिक वाचा..

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय ४२) यांनी मंगळवारी दुपारी कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद पाटील हे यापूर्वी लष्करी सेवेत १७ वर्षे कार्यरत होते. सध्या ते मीरा-भाईंदर येथे वाहतूक […]

अधिक वाचा..

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य, मार्गदर्शन आणि सक्षमीकरणासाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.यासंदर्भातील तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालय करण्यात आले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एकल पाल्य, समान संधी, सन्मान आणि सक्षमीकरण’ या विषयावरील […]

अधिक वाचा..

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीस बंदी असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे. शाळांमध्ये ‘तंबाखूमुक्त’ फलक लावून जनजागृती केली जात असताना, […]

अधिक वाचा..

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देणाऱ्या ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांमुळे राज्यातील सुमारे २,२०० तंत्रशिक्षण संस्था, ६ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि लाखो विद्यार्थ्यांना थेट लाभ होत आहे. गेल्या तीन वर्षांत […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि बेस्ट […]

अधिक वाचा..