राज्यात ३६ जिल्ह्यांत सुरू होणार सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे; प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार जिल्ह्यातच मार्गदर्शन

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत […]

अधिक वाचा..

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत आदिवासी विकासासाठी सरकार कटिबद्ध; एकनाथ शिंदे

मुंबई: भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कृती संवर्धन आणि हक्कांचे संरक्षण यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकभवनातील दरबार हॉल येथे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

अधिक वाचा..

गिरीष महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई: ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे केलेले वक्तव्य बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली. सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे […]

अधिक वाचा..

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्व घडविण्यासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; MSFDA कडून विशेष नेतृत्व विकास कार्यक्रम

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी : Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia’ या विशेष नेतृत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil […]

अधिक वाचा..

नेत्रदान, पर्यावरण संवर्धन आणि योगाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती; राज्यभर NSS चे विशेष अभियान सुरू

मुंबई: विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर विशेष जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय अभियानाचा […]

अधिक वाचा..

ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका; सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

मुंबई: ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनता दरबारात भेट घेऊन ॲसिड विक्रीवर कठोर नियंत्रण, प्रभावी देखरेख आणि कडक नियमावली लागू करण्याची मागणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी प्रतिनिधींचे म्हणणे आत्मीयतेने ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारात विविध शिष्टमंडळे, विकासकामांशी संबंधित प्रश्न […]

अधिक वाचा..

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. “अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार […]

अधिक वाचा..

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: “येळकोट येळकोट जय मल्हार!” या घोषणेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्तिभाव जागा होतो. मात्र आज एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे—खंडोबाच्या नावाने उधळला जाणारा भंडारा खरोखर शुद्ध हळदीचा असतो की रसायनांचा? महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या चरणी शतकानुशतके हळद अर्पण करण्याची परंपरा आहे. पण अलीकडच्या काळात बाजारात विकल्या […]

अधिक वाचा..

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असली, तरी ही कारवाई अपुरी आणि केवळ दिखाऊ असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी केली आहे. २०१५ मधील मालवणी विषारी दारू दुर्घटनेनंतर नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी झाली असती, तर […]

अधिक वाचा..