विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांच्या ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सुरू असून, काही ठिकाणी ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. या पैशांचा स्रोत, पैसे देणारे आणि घेणारे कोण, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी […]

अधिक वाचा..

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री यांनी केले. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, ठाणे-पालघरसह विविध विधानपरिषद मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना मिळालेला पाठिंबा हा राज्यातील जनतेचा […]

अधिक वाचा..

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल Library Grant Management System (LGMS) या ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या १४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार […]

अधिक वाचा..

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने सांस्कृतिक क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. या महत्त्वाच्या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असून मंत्रालय स्तरावरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एप्रिल २०२६ अखेरीस तत्कालीन संचालक बिभीषण चवरे यांनी पदभार सोडल्यानंतर हे […]

अधिक वाचा..

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचे सुपुत्र पैलवान महेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आयोजित भव्य नागरी सत्कार व गौरवनिधी पुरस्कार सोहळ्यास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना जयकुमार […]

अधिक वाचा..

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्यकारभार करण्याची ग्वाही देत चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची घोषणा केली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडपुते, आमदार अमोल खताळ, आमदार […]

अधिक वाचा..

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार घेतला आहे. शरद पवार यांच्यावरील टीका ही अर्धसत्यावर आधारित असून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. “शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना किती वेळा हमीभाव मिळाला?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या नवनाथ बन यांनी प्रथम सध्याच्या सरकारकडे कांदा […]

अधिक वाचा..

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित शाळांच्या समस्यांवर आमदार Satyajeet Tambe यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान परखड भूमिका मांडली. रिजनल टीचर ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार आणि आदर्श रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख उपस्थित होते. भेसळीविरोधात कठोर कारवाईची […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ गायक-अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ शास्त्रीय गायक, नाट्यसंगीताचे अभ्यासक आणि अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे शनिवारी गुवाहाटी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सहलीच्या निमित्ताने ते गुवाहाटी येथे गेले असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव रविवारी दुपारपर्यंत मुंबईत आणण्यात येणार असून दुपारी अडीचनंतर ठाणे पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात […]

अधिक वाचा..