विधानसभा निवडणुकीत जागावाटपामुळेच पराभव; उद्धव ठाकरे

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी आघाडीने निवडणूक आयोग आणि ‘लाडकी बहीण’ योजनेवर खापर फोडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरु राहिली.त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची कबुली शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. आघाडीवर प्रश्‍नचिन्ह सगळ्या गोष्टींत हात […]

अधिक वाचा..

रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अजितदादांनी दिला सल्ला; म्हणाले, भान ठेवूनच वागलं पाहिजे…

पुणे: विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यामध्ये हाणामारीची घटना नुकतीच घडली. यानंतर आव्हाड आणि आमदार रोहित पवार हे पोलिसांच्या भूमिकेविरोधात आक्रमक झाले होते. याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. […]

अधिक वाचा..

भाजप आमदार पडळकरांबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली मोठी माहिती, म्हणाल्या. 

पुणे: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मी सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे,’ असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ओरडतात आणि त्यांना चिथावणी देतात,’ असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. […]

अधिक वाचा..

फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा नाहीतर तुमच…

मुंबई: लातूरमध्ये ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. यावर आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आवर […]

अधिक वाचा..

उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार

मुंबई: मुंबईत २६ नोव्हेंबर १९९३ रोजीच्या दहशतवादी हल्ला खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून गाजलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, केरळ भाजपचे नेते सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासाच्या अभ्यासक डॉ. मीनाक्षी जैन यांची अलीकडेच राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली. यानंतर आता उज्ज्वल निकम यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा […]

अधिक वाचा..

अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे वाढला ओढा

डोंबिवली: डोंबिवलीत कॉग्रेस आणि मनसे ला खिंडार पडले असून विधानसभा निवडणूकीत सगळ्य़ात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणूकीचे बिगुल वाजयला सुरूवात झाली असून भाजपात जोरदार इनकमिंग सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. कॉग्रेस, मनसे यांच्यासह विविध मंडळातील कार्यकर्ते, शेकडो नागरिकांसह त्यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि […]

अधिक वाचा..

पंतप्रधानांच्या निवृत्तीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 वर्षांनंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होण्याचा सल्ला दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “आफ्टर मोदी?” या प्रश्नावर भाष्य करत भाजप आणि संघाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगतानाच, देशाला पक्षनिष्ठ नव्हे तर राष्ट्रनिष्ठ नेतृत्व हवे असल्याचे त्यांनी नुकत्याच […]

अधिक वाचा..

हॉटेलमधून बाहेर पडताना आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, नेमकं काय म्हणाले…

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकमेकांना भेटण्यासाठी तर हॉटेलमध्ये एकत्र आले तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी […]

अधिक वाचा..

त्याला धाक राहिला आहे की नाही; अजित पवार 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित पवार यांच्यावर […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! ठाकरे बंधूंच्या २ शिलेदारांनी हाती धरलं धनुष्यबाण

५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश मुंबई: महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून, सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिसत असतानाच, शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होताना दिसतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती तसेच महाआघाडीनं […]

अधिक वाचा..