Skip to content
मंगळवार, जून 09, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नजर

महाराष्ट्र राजकीय
जुलै 23, 2025शिरूर तालुका टीम

मुंबई: महायुती सरकारमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व खात्यावर नजर ठेवणार असल्याचे समोर आले आहे. तसेच निधी वितरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम मंजूरी देणार असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमताने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री कार्यालयाची नजर असणार आहे. नगरविकास खात्याचा निधा सर्व जिल्ह्यांना सारखा वाटला जातो की नाही हे तपासले जाणार आहे. महायुतीतील सर्व पक्षांना समान निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पाऊल उचलले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी काही ठराविक महापालिकांना भरीव निधी दिला होता. यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी केली होती. त्यामुळे आता निधावाटपात तिन्ही पक्षांना समान प्रमाणात निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नियोजन विभागाच्या निधी वितरणालाही फडणवीसांची सही लागणार आहे. याबाबत तिन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांची सही आवश्यक असणार आहे.

मुख्यमंत्रीच बॉस; वडेट्टीवार

देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयावर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘आता सर्वच ठिकाणी मुख्यमंत्रीच बॉस आहेत. बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहेत, बैलगाडी खेचण्याचं काम बारामतीकर आणि ठाणेकर करत आहेत. आपला वरचष्मा कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकार आपल्याकडे ठेवले आहेत. ‘

उदय सामंत काय म्हणाले 

नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी फडणवीसांना हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, उधळपट्टीला चाप लावण्यासाठी निर्णय घेतल्याचे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. हे तिन्ही नेते महायुती म्हणून काम करत आहेत. तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकास खातं चांगलं काम करत आहे.

Tagged accountCmEknath Shinde'seye

पोस्टचे नॅव्हिगेशन

…तर काँग्रेसला झटका! सतेज पाटलांची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात
भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर…

ऑगस्ट 27, 2022शिरूर तालुका टीम

चाकूचा धाक दाखवून महिलेवर परप्रांतीयाचा बलात्कार

सप्टेंबर 3, 2025सप्टेंबर 3, 2025शिरूर तालुका टीम

ऍड. गुलाबराव घोरपडेंच्या निधनाने काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ता गमावला…

एप्रिल 9, 2023एप्रिल 9, 2023शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर
  • शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण
  • प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा
  • शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…
  • काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Categories

  • आरोग्य (2,260)
  • इतर (152)
  • क्राईम (1,635)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (167)
  • महाराष्ट्र (4,848)
  • मुख्य बातम्या (2,089)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (959)
  • शिरूर तालुका (2,749)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर
  • शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण
  • प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा
  • शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…
  • काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!