शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील माजी सनदी आधिकारी विधानसभा लढवणार असल्याची जोरदार चर्चा

शिरुर (अरुणकुमार मोटे) राज्यात लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्या दृष्टीने अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद आजमावुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील एक माजी सनदी आधिकारी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची जोरदार तयारी करत आहे. घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे तेथील शेतकरी, कामगारवर्ग तसेच विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यावरील नाराज गट […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरुर येथील आश्रमाला सदिच्छा भेट

शिरुर (अरुणकुमार मोटे) अनाथांची माई पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरूर घोडनदी येथील मनःशांती छात्रालय अनाथ आश्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या शिरूर येथील मनःशांती अनाथ आश्रमातील अनाथ,गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत वाढदिवस साजरा केला.   तसेच आश्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..
purva-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…

पुणेः राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या अ‍ॅड. पूर्वा वळसे पाटील या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटात असलेल्या दिलीप वळसे पाटील यांची कन्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत शरद पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. दिलीप वळसे पाटील यांची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरु; जनतेतुन सरपंचपदासाठी अनेकजण इच्छुक

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ७ सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन त्या सात ग्रामपंचायत मध्ये करडे गावचीही पंचंवार्षिक निवडणुक होत आहे. करडे ग्रामपंचायतसाठी इतर मागास प्रवर्ग महिला (OBC) आरक्षण असुन गावातील अनेकजण सरपंचपदासाठी इच्छुक असुन गावातील माजी सैनिक नंदकिशोर रोडे यांच्या पत्नी पुष्पा रोडे यांच्यासह अनेकजण ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.   करडे […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-nitin-pacharne

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी भेट घेतली आहे. शिरूर शहरातील भापजा शहराध्यक्षांसह सोळा पदाधिकाऱ्यांनी नुकतेच राजीनामे भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष आबा सोनवणे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. ही बातमी कानावर येताच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी […]

अधिक वाचा..

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणुन महिला भगिनींना महिन्याला दिड हजार रुपये देण्याची घोषणा केली हि चांगली बाब आहे. परंतु त्याच बरोबर लाडक्या दाजींच्या दुधाला आणि शेतमालाला पण चांगला बाजारभाव द्यावा. तसेच ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी असा खोचक टोला डॉ अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला लागवला.   लोकसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा..
bjp-flag

खळबळजनक! शिरुर शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

शिरुर (अरुणकुमार मोटे) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधी‌ल भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. […]

अधिक वाचा..
chandan-sondekar

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिक्रापुर (प्रतिनिधी) ‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरीकांचे प्रश्न सुटणार हा देखावा असून, वास्तविक गेले पाच वर्ष नागरकांची प्रशासनाकडून पिळवणूक होत आहे. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार आहे, असे चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे. चंदन सोंडेकर हे विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. श्री. सोंडेकर म्हणाले, ‘आमदारांनी आघाडी सरकार असताना […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

नागपूर : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमानना खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने दिलीप वळसे पाटील यांना सहा आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे हे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सहकार सोसायटी कायद्याच्या अंतर्गत याचिकातर्ता हरिभाऊ मोहोड यांनी सहकारिता विभागाकडे अपील दाखल […]

अधिक वाचा..

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

कारेगाव (तेजस फडके) शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटूनही शिरुर तालुक्यात अजुनही निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरुच आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शिरुर तालुक्यातील सगळे मातब्बर पुढारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात गेले. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीनही पक्षात शिरुर तालुक्यातील मातब्बर पुढाऱ्यांची मोठी फौज आणि दुसरीकडे […]

अधिक वाचा..