शिक्रापूर पोलिसांची पार्किंग, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, बसथांबे, फुटपाथवरील अडथळे यावर व्यापाऱ्यांशी समन्वय बैठक

शिक्रापुर (ओंकार भोरडे): शिक्रापुर परिसरातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा व मोकळ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी व्यापारी असोसिएशन व विविध दुकानांचे व्यापारी प्रतिनिधी यांची समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसह बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था, […]

अधिक वाचा..

कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का बसून सविंदणेतील १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर दि. ९ ( अरुणकुमार मोटे): पाण्याची टाकी भरण्यासाठी शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सविंदणे (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गणेश भाऊसाहेब भोर असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सविंदणे येथील […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे चासकमान धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर पोहोचला असून, रांजणगाव गणपती परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी चासकमान धरणातून कोंढापुरी येथील तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे मोठे जाळे पुन्हा उघड!

दुधामध्ये विष कालवणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाईची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारोडी येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा व इतर घातक रसायनांचा वापर केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत उघड झाल्यानंतर तब्बल १२ […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू; दोन महिन्यांनंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC परिसरातील कारेगाव हद्दीतील एका कंपनीत उंचावर काम करताना एका कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत कामगाराच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन तब्बल दोन महिन्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी मोहन सुरेश ढमढेरे (रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर, जि.पुणे) या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील […]

अधिक वाचा..

करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…? 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांच्या वेळी चारचाकी वाहनांची बेशिस्त पार्किंग होत असल्याने या मार्गावर वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका रांजणगाव MIDC व परिसरातील कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱ्या कामगारांना बसत असून, “लग्न मोठ्यांचे, पण त्रास मात्र गरिबांना” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व कामगार […]

अधिक वाचा..

FDA चा कृत्रिम दूध भेसळीच्या राज्यव्यापी रॅकेटवर मोठा घाव; पाच जिल्ह्यांत एकाच वेळी छापे

१.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, २६ आरोपींवर गुन्हा; १३ जणांना अटक शिरुर (तेजस फडके) राज्यात कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर अन्न व औषध प्रशासनाने निर्णायक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच कंपन्यांमधील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या वतीने कंपनी प्रतिनिधींची दि ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत समन्वय बैठक रिया मीटिंग हॉल, रांजणगाव MIDC येथे पार पडली. या बैठकीत औद्योगिक परिसरातील कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध […]

अधिक वाचा..

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात केवळ चोरीचा तपास न करता फिर्यादी आणि नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल बांडे यांनी केली आहे. यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, […]

अधिक वाचा..

कवठे यमाईतील अल्पवयीन तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे यमाई (ता. शिरूर) येथील १७ वर्षीय तरुणाला जीवे मारण्याची तसेच हात-पाय तोडण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप असून, त्यानंतर भीतीपोटी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार आरोपीसह तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी समीर […]

अधिक वाचा..