शिरुर तालुक्यात लोकप्रतिनिधींची ‘विकासकामे कमी पण सोशल मीडियावर प्रसिद्धीचा भडिमार जास्त’

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या विद्यमान आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्या विकासकामांपेक्षा सोशल मिडियावरील जाहिरातबाजी’वर जास्त भर असल्याची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगत असुन सोशल मिडियावरील रिल मध्येच फक्त ‘विकास’ दिसत असुन ग्राउंड रियालिटी मात्र वेगळीच आहे.  शिरुर तालुक्यातील गावोगावी रखडलेली विकास कामे, अपुर्ण रस्ते, पाणीटंचाई, गटार, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, […]

अधिक वाचा..

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी सहन केली जाणार नाही; खंडणीखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील उद्योगांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. कंपन्यांना बेकायदेशीरपणे त्रास देणे, ठेके मिळवून देण्याच्या नावाखाली दबाव टाकणे किंवा खंडणीची मागणी करणाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. शुक्रवारी (दि. ३) शिक्रापूर पोलीस ठाण्यात एमआयडीसीतील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा; तक्रारीनंतरही प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील भीमा नदीपात्रातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवसाढवळ्या सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी पुन्हा एकदा तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. वारंवार तक्रारी करुनही संबंधित विभागाकडुन ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप अर्जदार निलेश भुजंग कोंडे यांनी केला आहे.  याबाबत निलेश कोंडे यांनी ३ जुलै २०२६ रोजी शिरुरच्या तहसिलदार […]

अधिक वाचा..

सोनेसांगवी सभामंडप प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे चौकशीचे आदेश; ग्रामपंचायत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील अनुसूचित जाती-जमाती समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या सभामंडपाच्या कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गंभीर दखल घेतली आहे. समाजकल्याण आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी नागरिकांना दिले ‘सरप्राईज गिफ्ट’

३.७५ लाखांचे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसर तसेच आठवडे बाजार आणि प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईल फोनबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्याबाबत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सूचना दिल्यानंतर तपास […]

अधिक वाचा..

रांजणगाव सांडस येथे ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइलची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

न्हावरे: शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील भीमा नदीकाठच्या शेतातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव सांडस येथील गट क्रमांक १५१ मधील भैरवनाथ अॅडिशनल ६३.२२ केव्ही क्षमतेच्या वीज ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल सांडून अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर उघडला. त्यानंतर त्यामधील सुमारे […]

अधिक वाचा..
shirur-kurshi-utpanna-bajar samiti

मोठा निर्णय! शिरूर बाजार समिती निवडणुकीला ब्रेक…

शिरूर (तेजस फडके): शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना उच्च न्यायालयाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने राबविण्याचे आदेश दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मतदार यादीतील त्रुटी आणि मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. निवडणुकीपूर्वीच मतदार […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडी करून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरातील दुकान फोडून दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले सुमारे १ लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तीन सराईत आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. डायल ११२ पथकाची सतर्कता, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील विश्वनाथ दाते यांचे निधन

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) सोनेसांगवी (ता. शिरुर) येथील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ शंकर दाते (वय ५८) यांचे गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनेसांगवी गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आपल्या शांत, मनमिळावू आणि साध्या स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे तसेच […]

अधिक वाचा..

शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार हे आमनेसामने आले असुन चासकमान कालव्याच्या पाणीवाटप आणि अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर “हेड टू टेल आणि टेल टू हेड समजायला विद्यमान आमदारांना अजून काही दिवस लागतील” अशी घणाघाती टिका माजी आमदार अशोक पवार यांनी कटके यांच्यावर केली.  […]

अधिक वाचा..