शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात भिसी (चिट फंड) योजनेच्या नावाखाली महिला व पुरुष पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांकडून विश्वास संपादन करून लाखो रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात काही पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनीही पैसे  गुंतवल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस दलातही […]

अधिक वाचा..

रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी; अनोसेवाडी अंधारात

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील अनोसेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी विजेचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शनिवार (दि 28) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रोहित्राचे बाह्य आवरण फोडून आतमधील तांब्याच्या तारा आणि इतर […]

अधिक वाचा..

निमोणे गावठाणात गावठी दारुचा सुळसुळाट; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनधिकृत विक्री सुरु 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निमोणे गावठाण हद्दीत अनधिकृतरीत्या गावठी दारूची विक्री सुरुचं असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावठाण भागात उघडपणे सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. गावठाणातच ‘दारुचे अड्डे’…? स्थानिक […]

अधिक वाचा..
shirur-blast

शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती तसेच पिंपरी दुमाला परिसरात सोमवारी (ता. २) अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाच्या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) प्रत्यक्षदर्शींनी सांगितले […]

अधिक वाचा..
Santosh-Khedkar-Maharaj

शिरूर! शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा उत्साहात प्रस्थान!

शिरूर: श्री क्षेत्र खंडाळे-रांजणगाव गणपती येथून श्री क्षेत्र पैठण कडे निघालेल्या शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा प्रस्थान समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संत एकनाथ महाराज संस्थान पैठण चे फडकरी म्हणून मान मिळालेल्या भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था / संत निळोबाराय गाथा मंदिर संस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पायी वारीचा प्रस्थान सोहळा मोठ्या […]

अधिक वाचा..

सरकारी दप्तर थेट गावात! शिरूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’चा धडाका

शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीचे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये श्री शिवमहापुराण कथेला लाखोंची गर्दी; उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम ठरला ऐतिहासिक

शिरूर (अरुणकुमार मोटे): धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला “श्री शिवमहापुराण कथा” सोहळा शिरूरमध्ये ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेला कथेच्या ६ व्या दिवशी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी शिरूरच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे. […]

अधिक वाचा..
Kavita-Dhaybar

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील कविता संदीप धायबर यांना महिला सबलीकरण व उन्नतीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो टायर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारादरम्यान कविता धायबर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. […]

अधिक वाचा..
abhinav-vidyalay-saradwadi

शिरूर! अभिनव विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात उल्लेखनीय भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित “शिरूर तालुका शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५/२६” अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी गटामध्ये शिरूर तालुक्यातील अभिनव विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण निकाल आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बळावर विद्यालयाने तालुक्यात आपली […]

अधिक वाचा..

न्हावरेत किराणा दुकान फोडून धाडसी चोरी; चोरटा सिसीटिव्ही मध्ये कैद 

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात गुरवार (दि 26) मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकान फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन येळे यांच्या कोकरे किराणा स्टोअर या दुकानाचे छतावरील पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि रोकड लंपास करून पसार झाला. संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटिव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. याबाबत मिळालेल्या […]

अधिक वाचा..