घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी…?   शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातुन दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असतानाही संबंधित प्रशासनाच्या कारवाईचा पत्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. धरण परिसरातील वाळू अक्षरशः ओरबाडली जात असताना अधिकारी आणि यंत्रणा नेमकी कोणाची वाट पाहत आहेत…? असा […]

अधिक वाचा..
dr-namdev-shendkar

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी तसेच विविध शिष्यवृत्ती विषयक उपक्रमांमुळे पुणे जिल्हा मार्गदर्शक ठरत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी आहे, असे पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नामदेव शेंडकर यांनी म्हटले आहे. शिरूरमध्ये मुख्याध्यापक सहविचार सभेत ते बोलत […]

अधिक वाचा..

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर झाल आहे. अशा काळात काही लाख रुपये किमतीचा सोन्याचा दागिना हातात सापडल्यानंतर त्याचा मोह आवरणे अनेकांसाठी कठीण असते. मात्र, आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मनात कोणताही लोभ न ठेवता इस्त्रीच्या कपड्यात सापडलेला अडीच तोळ्यांचा सोन्याचा गंठण त्याच्या मुळ मालकाला […]

अधिक वाचा..
maruti-thorat-guruji

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता. ७) अपघाती निधन झाले. वाघाळे येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाघाळे-रांजणगाव रस्त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात थोरात गुरुजी जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..
nitin-thorat-and-farmer

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या मागणीसाठी शिरूर तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ७) राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन निवेदन दिले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सलग २७ वर्षे शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील शेतकरी कारखान्याला ऊस पुरवठा करीत आहेत. या शेतकऱ्यांचे कारखान्याशी […]

अधिक वाचा..
shivaji-khedkar-ranjangaon

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी (ता. ७) ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बेकायदेशीर सावकारी, अवाजवी व्याज आकारणी, कर्जदारांना दिला जाणारा मानसिक त्रास, सावकारांविरोधात तक्रार करण्याची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी सात ते आठ महिन्यांची […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेसह धडाकेबाज कारवाई; महाराष्ट्र-मध्यप्रदेशात घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांत घरफोडीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापुर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दिपक भिमराव दांडगे (वय २५, रा. घुग्री, ता. भैसदेही, जि. बैतुल, मध्यप्रदेश; सध्या रा. […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात शेतीपंपांसाठी वीजपुरवठ्याचे सध्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, त्यातच तालुक्यात विविध भागांत बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. शेती पंपासाठी एका आठवड्यात दिवसा सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत […]

अधिक वाचा..

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील शिक्षकांचा पेन आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीने हा उपक्रम राबविला. शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार देऊन त्यांना जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य […]

अधिक वाचा..